काबुल, 21 जानेवारी: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानला (Taliban) विरोध करणाऱ्या नॅशनल रेजिस्टंट फ्रंट (National Resistance Front) या गटाने तालिबानी फायटर्सवर (Talibani Fighters) हल्ला (Attack) केला. यावेळी दोन्ही गटांत जोरदार धुमश्चक्री झाली आणि तालिबानी फायटर्सनी NRF च्या आठ जणांना कंठस्नान (8 dead) घातलं. आठही जणांना ठार करून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार फायरिंग केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. तालिबानला आव्हान गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर देशातील हिंसाचार थांबेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. गेल्या काही वर्षांपासून अमेरिका पुरस्कृत सरकारचे सैनिक विरुद्ध तालिबान फायटर्स असा संघर्ष सातत्याने सुरु होता. अमेरिेकेने सरकार स्थापन केल्यापासून अमेरिका बाहेर पडेपर्यंत सातत्यानं तालिबानी फायटर्स अमेरिकेच्या सैनिकांविरोधात लढत होते. त्यानंतर अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानकडून अफगाणिस्तान सरकारला सशस्त्र विरोध सुरू झाला होता. मात्र आता खुद्द तालिबानची सत्ता आल्यानंतर तरी हा रक्तरंजित प्रकार थांबण्याची अपेक्षा होती. तयार होतंय दुसरं तालिबान सत्ताधाऱ्यांवर सशस्त्र हल्ले करणं आणि आपलं अस्तित्व दाखवून देणं, यासाठी आतापर्यंत तालिबानची ओळख होती. मात्र आता तालिबान सत्तेत असून तालिबानची जुनी ओळख आता NRF तयार करू पाहतंय का, असा प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे. तालिबानचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या कमांडर अहमद शाह मसूद यांचा पुत्र आता या गटाचं नेतृत्व करत असून आपल्या वडिलांनी सुरु केलेला तालिबानचा विरोध त्यानेही कायम ठेवला आहे. हे वाचा -
तालिबानचे विरोधक एकत्र तालिबानच्या कार्यपद्धतीला विरोध असणाऱ्या सर्वांना एकत्र करून तालिबानविरोधात एक मजबूत फळी तयार कऱण्याचं काम सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असल्याचं चित्र आहे. त्यासाठी विविध गट एकमेकांच्या संपर्कात असून NRF त्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती आहे.