Home /News /videsh /

याठिकाणी पक्ष्यांमध्ये वाढतोय Avian flu, 13 लाख पाखरांची कत्तल करणार सरकार

याठिकाणी पक्ष्यांमध्ये वाढतोय Avian flu, 13 लाख पाखरांची कत्तल करणार सरकार

फ्रान्समध्ये पक्ष्यांना एव्हियन फ्लूचा (Avian flu) प्रादुर्भाव होताना दिसत आहे. एव्हियन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फ्रान्स सरकार (France Government) सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

पॅरिस, 21 जानेवारी: युरोपीय देश (Coronavirus European Countries) सध्या कोरोनाचा सामना करत आहेत. त्यातच फ्रान्समध्ये पक्ष्यांना एव्हियन फ्लूचा (Avian flu) प्रादुर्भाव होताना दिसत आहे. एव्हियन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फ्रान्स सरकार (France Government) सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. फ्रान्समध्ये यापूर्वी बर्ड फ्लू (France Bird Flu) चा चार वेळा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यात आता एव्हियन फ्लूचं संकट वाढत आहे. एव्हियन फ्लूचा प्रसार कमी व्हावा यासाठी फ्रान्स सरकार मोठ्या प्रमाणात पक्षी मारणार आहे. फ्रान्समध्ये एव्हियन फ्लू नावाचा आजार पक्ष्यांमध्ये खूप वेगाने पसरत आहे. एव्हियन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या काही आठवड्यांमध्ये विविध पोल्ट्री फार्म्समधील (Poultry Farms) 10 लाखांहून अधिक पक्षी मारून नष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचं फ्रान्स सरकारनं गुरुवारी सांगितलं. हे वाचा-Good News: भारत-अमेरिका विमानफेऱ्या पुन्हा होणार सुरु सरकारने सांगितलं की फ्रान्समधील लँडर्स, गेर्स आणि पायरेनीस अटलांटिक प्रदेशातील सुमारे 226 नगरपालिका क्षेत्रांतील सुमारे 1.3 दशलक्ष बदकं (Duck), कोंबड्या (Hens) आणि टर्की (Turkey) हे पक्षी मारून त्यांचे मृतदेह नष्ट करण्यात येतील. 'या संपूर्ण परिसरातील पक्षी नष्ट करण्यासाठी आम्हाला सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागेल', असं फ्रान्स सरकारच्या कृषी मंत्रालयानं सांगितलं. 'या भागांमध्ये एव्हियन फ्लू झपाट्याने पसरत असून, या भागातील पक्षी नष्ट केल्यास त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल तसेच अन्य भागातील पोल्ट्री फार्म्सपर्यंत हा विषाणू (Virus) पोहोचण्यापासून रोखता येईल', अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. फ्रान्समध्ये नोव्हेंबरमध्ये एव्हियन फ्लूचा उद्रेक सुरू झाला. हा आजार नियंत्रित राहावा यासाठी फ्रान्स सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. एव्हियन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक पक्षी मारून नष्ट केले आहेत. मृत पक्ष्यांच्या मोबदल्यात सरकार शेतकरी आणि पोल्ट्री फार्म्सधारकांना नुकसान भरपाई देत आहे. पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी सरकारने तज्ज्ञांव्यतिरिक्त पशुवैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कामगारांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याबाबत योजना तयार केली आहे. हे वाचा-एक Whatsapp Forward पडला महागात, पाकिस्तानी महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा फ्रान्ससह युरोपातील अनेक देश या फ्लूच्या अत्यंत संसर्गजन्य अशा H5N1 या व्हेरियंटचा (Variant) सामना करत आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी अनेक युरोपीय देशांमध्ये प्राण्यांना लक्ष्य करणाऱ्या अशाच एका विषाणूचा उद्रेक झाल्याचं दिसून आलं होतं. फ्रान्समध्ये त्यात विशेषतः नैऋत्य फ्रान्समध्ये 2015 पासून चार वेळा बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचा पाहायला मिळालं होतं. याच कारणामुळे गेल्या वर्षी हिवाळ्यात 3.5 दशलक्ष कोंबड्या मारून नष्ट करण्यात आल्या होत्या. एव्हियन फ्लू वाढल्याने अशाच पध्दतीची मोहीम पुन्हा राबवली जाणार आहे.
First published:

Tags: France

पुढील बातम्या