Home /News /videsh /

सार्वजनिक स्थळी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालावा, अन्यथा...; तालिबानचा आदेश

सार्वजनिक स्थळी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालावा, अन्यथा...; तालिबानचा आदेश

अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान सरकारने (Taliban Government) आणखी एक निर्णय घेतला आहे. तालिबानच्या नेतृत्वाने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला झाकणारा बुर्का घालण्याचा आदेश दिला आहे.

  काबूल, 8 मे : अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान सरकारने (Taliban Government) आणखी एक निर्णय घेतला आहे. तालिबानच्या नेतृत्वाने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला झाकणारा बुरखा (burqa) घालण्याचा आदेश दिला आहे. तालिबान सरकारच्या आचरण आणि नैतिकता मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. तालिबान सरकारचा आणखी एक धक्कादायक निर्णय - ऑगस्टमध्ये सत्तेवर आल्यानंतर तालिबानने दावा केला होता की, ते पूर्वीच्या राजवटीच्या (1996 ते 2001) पेक्षा इस्लामिक राजवटीची नरमाईची भूमिका घेतील. मात्र, हळूहळू तालिबानने सामाजिक जीवनावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. हळूहळू महिलांवरही बंधने लादण्यात आली. मुलींसाठी बहुतांश माध्यमिक शाळा बंद आहेत. तर महिलांना अनेक सरकारी नोकऱ्या आणि परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. महिलांना वरिष्ठ किंवा पुरुष नातेवाईकासोबत असल्याशिवाय अफगाण शहरांमध्ये प्रवास करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. यातच आता आणखी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे, महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकले जाईल, असा बुरखा घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालिबानचे आचरण आणि नैतिकता मंत्री खालिद हनाफीने सांगितले की, आमच्या बहिणी सम्मानाने आणि सुरक्षित राहाव्यात, अशी आमची इच्छा आहे. जर कोणत्या महिलेने बुरखा नाही घातला तर सरकारी नोकरी करणारे तिचे वडील किंवा जवळच्या नातेवाईकाला नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल आणि तुरुंगात जावे लागले. इतकेच नाही तर वृद्ध महिलांना सुद्धा डोळे सोडून संपूर्ण शरीर झाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने अशाच प्रकारचे कडक निर्बंध लावले होते. हेही वाचा - Russia Ukraine War : रशिया क्षेपणास्त्र दहशतवाद करत असल्याचा युक्रेनचा आरोप, झेलेन्स्की म्हणाले..

  तालिबानने TikTok आणि PUBG वर घातली बंदी -

  अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबान सरकारने (Taliban Government) व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक (TikTok) आणि सर्वाइवल-शूटर प्लेयर यूएनडॉग्स बैटलग्राउंड (PUBG) या खेळावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तानातील तरुणांची दिशाभूल या खेळांमुळे होत आहे, असे तालिबानने म्हटले आहे. मागच्या वर्षी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर सत्ता स्थापन केली. यानतंर तिथे संगीत, चित्रपट आणि सीरिअल्सवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. आता टिकटॉक आणि पबजी यावर प्रतिबंध लावण्यात आल्यामुळे तेथील लोकांच्या मनोरंजनाची साधने कमी झाली आहे.

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Afghanistan, Taliban, Woman

  पुढील बातम्या