Home /News /videsh /

Russia Ukraine War : रशिया क्षेपणास्त्र दहशतवाद करत असल्याचा युक्रेनचा आरोप, झेलेन्स्की म्हणाले..

Russia Ukraine War : रशिया क्षेपणास्त्र दहशतवाद करत असल्याचा युक्रेनचा आरोप, झेलेन्स्की म्हणाले..

युक्रेनने (Ukraine) रशियावर (Russia) युद्धादरम्यान क्षेपणास्त्र दहशतवादाचा (Missile Terrorism) वापर केल्याचा आरोप केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, रशिया युक्रेनच्या शहरांवर खूप क्षेपणास्त्रे हल्ला करून लोकांमध्ये दहशत पसरवू इच्छित आहे. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला पुरवली जाणारी शस्त्रे युक्रेनच्या सैन्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी त्यांनी हे क्षेपणास्त्र हल्ले केले असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

पुढे वाचा ...
    मॉस्को, 6 मे : रशिया-युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) रशियाचे युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले सुरुच आहेत. रशियाने (Russia) नुकतेच युक्रेनच्या पुरवठा यंत्रणेवर हल्ला केला आणि देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं. रशियाची तक्रार आहे की पश्चिमेचे देश युक्रेनला शस्त्रे पुरवत आहे, तर युरोपियन युनियन (European Union) तेल आयाती वर बंदी घालून रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी करत आहे. यात युक्रेनचे म्हणणे आहे की, रशियाने युक्रेनच्या लोकांना घाबरवण्यासाठी क्षेपणास्त्र दहशतवादाचा (Missile Terrorism) अवलंब केला आहे. या आरोपाला अर्थ आहे का? युद्ध हे फक्त सैनिकांमध्ये लढले जात नाही. उलट, यात अनेक ट्विस्ट्स आणि टर्न गुंतलेले आहेत, जसे की शत्रू व्यतिरिक्त उर्वरित जगाची सहानुभूती मिळविण्याची स्पर्धा. म्हणूनच प्रसारमाध्यमांच्या माहिती प्रसरणाच्या तंत्राला "मॅनेज करण्याचा प्रयत्न" केला जातो. युद्धाच्या रणनीतीनुसार देशांकडून वक्तव्य दिली जातात. सर्व आरोप आणि प्रस्ताव हे ठरवूनच केले जातात. अशा स्थितीत युक्रेनने क्षेपणास्त्र दहशतवाद हा शब्द वापरणे कितपत खरे आहे, याचा विचार करावा लागेल. आरोप-प्रत्यारोप युद्धाप्रमाणे या टप्प्यातही आरोप केले जातात. उदाहरणार्थ, एकीकडे युक्रेनने म्हटले आहे की रशियन सैन्याने मोरुपोलमधील अजोवास्टल स्टील मिलवर हल्ला केला आहे, तर रशिया हा आरोप फेटाळून लावला आहे. रशियन सैन्याने असेही म्हटले आहे की त्यांनी युक्रेनमधील पाच रेल्वे स्थानकांवर वीज पुरवठा साइट नष्ट करण्यासाठी समुद्र आणि हवाई हल्ल्यांचा वापर केला आहे. याशिवाय शस्त्रे आणि इंधन डेपो इत्यादींवरही हल्ले केले आहेत. क्षेपणास्त्र दहशतवाद आरोप अशा परिस्थितीत रशिया युक्रेनमध्ये दहशत पसरवण्यासाठी क्षेपणास्त्र दहशतवादाचे डावपेच अवलंबत असल्याचा आरोप युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केला आहे. बुधवारी रात्री युक्रेनच्या सर्व शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. राजधानी कीवसह युक्रेनच्या मध्य, आग्नेय शहरांमध्येही हल्ले झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सर्व गुन्ह्यांना उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. क्षेपणास्त्र दहशतवाद काय आहे? सोप्या शब्दात सांगायचे तर, दहशतवाद ही अशी हिंसा आहे ज्याचा उद्देश लोकांना मारण्याऐवजी मोठ्या गटात दहशत पसरवणे हा आहे, जेणेकरून कोणतीही कृती किंवा विचारधारा थांबवता येईल. या हिंसाचारामध्ये फक्त एका स्फोटापासून (ज्यामध्ये कोणीही मारले जात नाही) ते एका विशिष्ट वर्गाच्या लोकांच्या हत्येपर्यंतच्या घटनांचा समावेश असू शकतो. Russia Ukraine War : रशियाने केला मारियुपोल स्टील प्लांटवर हल्ला, जवानांसह शेकडो नागरिकही अडकले क्षेपणास्त्राचा दहशतवादाशी संबंध? युक्रेनने केलेल्या आरोपांचा अर्थ असा आहे की, रशिया युक्रेनच्या लोकांना क्षेपणास्त्र हल्ले करून घाबरवण्याचे काम करत आहे. म्हणजेच आजकाल युक्रेनवर झटपट क्षेपणास्त्र हल्ले करणाऱ्या रशियाचा उद्देश युक्रेनच्या सैनिकांना मारणे हा नसून लोकांमध्ये दहशत पसरवणे हा आहे. किती प्रभावी आहेत हे हल्ले? यूएस तज्ञ सहमत आहेत की रशियाने युक्रेनच्या रेल्वे पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत, त्यात पोलंडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह शहर आणि नाटो शस्त्रास्त्र पुरवठ्याचे प्रवेशद्वार आहे. मात्र, त्याचा पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे अमेरिकी अधिकाऱ्यांचे मत आहे. शस्त्र पुरवठा नाटोने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवल्याचा हा परिणाम होता की सुरुवातीच्या टप्प्यात रशियाला युक्रेनविरुद्ध पूर्णपणे यश मिळू शकले नाही आणि नंतर त्याला आपली रणनीती बदलावी लागली. आता त्याचे लक्ष्य डॉनबास काबीज करणे आहे, जे त्याचे प्राधान्य बनले आहे. त्याचबरोबर युक्रेनने पाश्चात्य देशांना शस्त्रांचा पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले आहे. युद्ध रणनीतीच्या दृष्टिकोनातून रशियासाठी, शहरांमधील निवासी तळांवर हल्ल्यांपेक्षा युक्रेनच्या शस्त्र पुरवठ्यावर परिणाम होईल अशा तळांवर हल्ले करणे अधिक उपयुक्त आहे. सध्या रशिया असे करत असल्याचा दावा करत असून अमेरिकन तज्ज्ञ हे हल्ले कुचकामी मानत आहेत. पण क्षेपणास्त्र दहशतवाद रशियासाठी फायदेशीर ठरेल, असा दावा करता येणार नाही. दोन्ही बाजूंपैकी कोणता दावा बरोबर आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या