मराठी बातम्या /बातम्या /विदेश /आपल्याच फायटर्सच्या 'अय्याशी'चा तालिबानला वैताग, काढलं नवं फर्मान

आपल्याच फायटर्सच्या 'अय्याशी'चा तालिबानला वैताग, काढलं नवं फर्मान

तालिबाननं अफगाणिस्तानातील नागरिकांवर अनेक बंधनं लादली असली (Taliban is worried by enjoyment and selfie of it's fighters) तरी आता तालिबानी फायटर्सचं ती झुगारून अय्याशी करू लागल्याचं चित्र आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानातील नागरिकांवर अनेक बंधनं लादली असली (Taliban is worried by enjoyment and selfie of it's fighters) तरी आता तालिबानी फायटर्सचं ती झुगारून अय्याशी करू लागल्याचं चित्र आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानातील नागरिकांवर अनेक बंधनं लादली असली (Taliban is worried by enjoyment and selfie of it's fighters) तरी आता तालिबानी फायटर्सचं ती झुगारून अय्याशी करू लागल्याचं चित्र आहे.

काबुल, 27 सप्टेंबर : तालिबाननं अफगाणिस्तानातील नागरिकांवर अनेक बंधनं लादली असली (Taliban is worried by enjoyment and selfie of it's fighters) तरी आता तालिबानी फायटर्सचं ती झुगारून अय्याशी करू लागल्याचं चित्र आहे. पर्यटनस्थळी जाणे, सेल्फी काढणे, एन्जॉय करणे अशा (Taliban fighters tourism, selfie is not allowed) प्रकारांमुळे हे फायटर्स संघटनेची प्रतिमा खराब करत असल्याची चिंता तालिबानला सतावू लागली आहे.

नो सेल्फी प्लीज!

तालिबानी फायटर्सनी केवळ देशसेवासाठी स्वतःला वाहून घेण्याचे फर्मान संघटनेनं काढलं आहे. फायटर्सनी पर्यटन स्थळी जाणे, तिथे सेल्फी काढणे आणि सोशल मीडियावर अपलोड कऱणे यासारखे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. ही छछोरगिरी असून तालिबानच्या कट्टर प्रतिमेला हे वागणं छेद असल्याची भीती तालिबानला वाटत आहे. त्यासाठी जाहीर फर्मान काढून तालिबाननं आपल्या फायटर्सना इशारा दिला आहे.

प्रतिमा सांभाळण्याचा इशारा

हजारो फायटर्सच्या बलिदानातून तालिबान संघटना उभी राहिली आहे. तुम्हाला जे काम दिलं आहे, ते मन लावून आणि लक्ष देऊन करा. देशाच्या उभारणीत हातभार लावा, असं आवाहन मोहम्मद याकूब या तालिबानी नेत्यानं फायटर्सना केलं आहे. शेकडो सैनिकांच्या समर्पणाचा अपमान करून तुम्ही करत असलेली मौजमजा ही देशाला मागे नेणारी असल्याची खंत तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.

गुप्ततेची चिंता

तालिबानचे तरुण फायटर्स हे खूप सेल्फी काढतात, अशीही तालिबानच्या नेत्यांची तक्रार आहे. त्यामुळे तालिबानी सैन्याची गुप्त ठिकाणं जाहीर होऊ शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारे गोपनीयतेचा भंग होऊ शकतो, अशी भीती तालिबानला वाटत आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानी फायटर्स वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

हे वाचा -Shaving करू नका, ट्रिमरही वापरू नका! तालिबानच्या सर्व सलून चालकांना सूचना

कपड्यांवरही आक्षेप

तालिबानी फायटर्स हे संकेतांनुसार कपडे आणि पेहराव करत नसल्याचीही तक्रार वरिष्ठ नेत्यांची आहे. अनेक फायटर्स हे पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे वापरत असून ते तालिबानच्या ड्रेस कोडमध्ये बसत नसल्याची खंत तालिबाननं व्यक्त केली आहे. अमेरिकेप्रमाणे आपण वागू लागलो, तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय, असा सवाल तालिबानचे नेते फायटर्सना विचारत आहेत.

First published:

Tags: Afghanistan, Selfie, Taliban