जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / VIDEO गैरसमजूतीतून इराणी सैनिक आणि तालिबानी सैनिक यांच्यात हिंसक संघर्ष

VIDEO गैरसमजूतीतून इराणी सैनिक आणि तालिबानी सैनिक यांच्यात हिंसक संघर्ष

Iran Forces and Taliban Clashed on Afghan Border

Iran Forces and Taliban Clashed on Afghan Border

अफगाणिस्तान-इराण (Iranian security forces and Taliban fighters clashed ) सीमेवर गैरसमजूतीतून दोन्ही सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

तेहरान, 2 डिसेंबर: अफगाणिस्तानवर (Afghanistan Crisis) तालिबान्यानी(Taliban Government) कब्जा केल्यापासून दररोज दहशतवादी हल्ले होत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तान-इराण सीमेवर इराणी सैनिक आणि तालिबानी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची माहिती मिळाली आहे. गल्फ न्यूजच्या माहितीनुसार, या हिंसक चकमकीत कोणत्याही मृत्यूचे वृत्त नसले तरी. ही चकमक गैरसमजूतीतून हा प्रकार घडल्याचे (Iranian security forces and Taliban fighters clashed in a gun battle over a “misunderstanding”) सांगण्यात आले. या घटनेचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तालिबानी सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. त्यांच्यात गोळीबारही झाला आहे. तालिबानला प्रत्युत्तर देताना इराणकडून गोळीबार करण्यात आला. इराणची वृत्तसंस्था तसनीमने हिरमंद परगण्यातील शघलक गावात ही लढत झाल्याचे सांगीतले आहे.

नेमकं घडलं काय?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संलग्न तस्नीम एजन्सीने सांगितले की, तस्करी रोखण्यासाठी अफगाणिस्तानच्या सीमेजवळील इराणी प्रदेशात भिंती उभारण्यात आल्या आहेत. अहवालात असे म्हटले आहे की काही इराणी शेतकऱ्यांनी भिंती ओलांडल्या होत्या परंतु तरीही ते इराणच्या सीमेत होते. मात्र तालिबानी सैन्याला वाटले की शेतकरी आपल्या भागात आले आहेत, त्यामुळे त्यांनी गोळीबार सुरू केला.

जाहिरात

चर्चेनंतर थांबली चकमक

या प्रकरणी इराणच्या अधिकाऱ्यांनी तालिबानशी चर्चा केली, त्यानंतर हा संघर्ष संपला. नंतर बुधवारी, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादेह यांनी तालिबानचे नाव न घेता एका निवेदनात सांगितले की, “सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांमधील गैरसमजांमुळे” ही लढाई झाली. एका व्हिडिओमध्ये तालिबानी सैन्याने इराणच्या हद्दीत दाखविले आहे, ज्यात तालिबानी सैनिकांनी अनेक चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. मात्र, तसनीमने हा दावा फेटाळून लावला आहे.

कब्ज्याचा दावा इराणने फेटाळला

इराणकडून सांगण्यात आले की, सीमेवरील व्हिडीओमध्ये लढाईचे सुरुवातीचे भाग दिसत आहेत आणि आता देशाच्या सीमेवर सुरक्षा दलांचे पूर्ण नियंत्रण आहे. IRGC (इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स) शी संबंधित आणखी एका न्यूज वेबसाइटने सांगितले की, लढाईमुळे कोणीही मरण पावले नाही आणि येथे पूर्ण शांतता आहे. सिस्तान आणि बलुचिस्तानच्या गव्हर्नरचे सुरक्षा डेप्युटी मोहम्मद मराशी यांनी इराणच्या सरकारी टेलिव्हिजनशी संवाद साधला असता ते म्हणाले, चकमकी गंभीर नसून कर्मचारी किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. परदेशी सैन्याने माघार घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. इराणने अधिकृतपणे तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात