काबूल, 19 ऑगस्ट :अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर कायदा सुव्यवस्थेची (Law and order) स्थिती बिकट झाली आहे. अनेक नागरिक (foreign citizens) अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तालिबानी फायटर्स (Taliban fighters) या नागरिकांची अडवणूक करत असल्याचं चित्र आहे. अफगाणिस्तानचे नागरिक असणाऱ्यांना तर विमानतळावर प्रवेश (Entry on airport) दिला जात नाही, मात्र इतर देशांतील नागरिकांनाही विमानतळावर सोडलं जात नसल्याचं चित्र आहे. या बाबीचं रिपोर्टिंग करणाऱ्या अमेरिकेतील CNN International च्या महिला पत्रकार क्लॅरिसा वॉर्ड (Clarissa Ward) यांनाही तालिबाननं घेरल्याचं एका व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.
Taliban fighters charge at CNN's Clarissa Ward and crew. @clarissaward reports on the hurdles Americans and Afghans are facing trying to get to Kabul's airport as Taliban fighters attempt to block access with gunfire and violence. https://t.co/2F0L4kwBMK pic.twitter.com/FWxBTxEO22
— CNN International (@cnni) August 19, 2021
काबूल एअरपोर्टबाहेरील दृश्य
काबूलमध्ये अनेकजण विमानतळावर दाखल होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मोठ्या संख्येनं तालिबानी फायटर्स विमानतळाबाहेर तैनात आहेत. कागदपत्रांची तपासणी करून विमानतळावर प्रवेश देण्यासाठी ते उभे असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अनेक परदेशी नागरिकांकडं पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं असूनदेखील त्यांना विमानतळावर सोडलं जात नसल्याचं चित्र आहे.
महिला पत्रकाराला घेरलं
अफगाणिस्तानमधून बाहेर पडू पाहणाऱ्या या सर्वसामान्य नागरिकांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पत्रकार क्लॅरिसा वॉर्ड यांच्यावरही तालिबानी फायटर्सनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र आहे. या व्हिडिओत क्लॅरिसा यांच्याकडे आपली कागदपत्रं घेऊन येणारे अनेक नागरिक दिसत आहेत. त्या कागदपत्रं असूनही नागरिकांना प्रवेश का दिला जात नाही, असा सवाल तालिबानी फायटर्सना करताना या व्हिडिओत दिसतं. त्यावर आपल्याला तुमच्याशी बोलायचंच नाही, असं म्हणणारा एक तालिबानी फायटर्स सुरुवातीला दिसतो.
हे वाचा -पुण्यात गुंडांचा हैदौस; कोयते अन् तलवारी घेऊन भररस्त्यात नंगानाच, धक्कादायक CCTV
त्यानंतर मात्र तालिबान्यांना ही बाब सहज होत नसल्याचं दिसतं. विमानतळाबाहेरील अडकून पडलेल्या नागरिकांच्या व्यथा मांडणार्या क्लॅरिसा यांना तालिबानी फायटर्स घेरत असल्याचं व्हिडिओच्या शेवटी दिसतं. जर अमेरिकी आणि इतर देशांतील नागरिकांनाही विमानतळावर प्रवेश मिळत नसेल, तर सर्वसामान्य अफगाणी नागरिकाची काय परिस्थिती असेल, याचा विचारही न केलेला बरा, असं या रिपोर्टच्या शेवटी क्लॅरिसा म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban