मराठी बातम्या /बातम्या /पुणे /VIDEO: पुण्यात गुंडांचा हैदौस; कोयते अन् तलवारी घेऊन भररस्त्यात नंगानाच, धक्कादायक CCTV आला समोर

VIDEO: पुण्यात गुंडांचा हैदौस; कोयते अन् तलवारी घेऊन भररस्त्यात नंगानाच, धक्कादायक CCTV आला समोर

पुण्यात गुंडांनी तलवार आणि कोयते नाचवत धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यात गुंडांनी तलवार आणि कोयते नाचवत धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यात गुंडांनी तलवार आणि कोयते नाचवत धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

पुणे, 19 ऑगस्ट : पुण्यात गुंडांचा हैदोस सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात कोयते आणि तलवारी नाचवत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद (Goons with sword caught in CCTV) झाली आहे. पुण्यातील सय्यदनगरमध्ये (Sayyed Nagar Pune) गुंडांचा तलवारी-कोयते नाचवत धुमाकूळ सुरू असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. गाड्यांची तोडफोड, कोयत्याने वार करत तरुणाचे पैसे लुटले. या घटनेनंतर स्थानिक महिलांनी कारवाईसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.

सय्यदनगरमध्ये गल्ली नंबर 11 आणि 12 मध्ये रस्त्यावर स्थानिक लँड माफियाने गुंडांच्या टोळीने सोमवार रात्री 9.30 च्या सुमारास तलवारी, कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच घातला. सय्यदनगर परिसरात आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी 20 ते 22 गुंडांनी घरांमध्ये घुसून महिला आणि लहान मुलांना मारहाण केली. तर पुण्यातील मंगळवार पेठेतील मुजिफ तांबोळी हा तरुण व्यापारी टीव्ही स्पेअर पार्टसचे बिल देण्याकरिता आला होता. त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्याजवळ असलेले 27 हजाराची रक्कमही या गुंडांच्या टोळक्याने लुटली.

कोरोना काळात मुंबईत 'मुन्नाभाई MBBS' चा सुळसुळाट; पोलिसांनी आवळल्या पाच बोगस डॉक्टरांच्या मुसक्या

स्थानिक नागरिक आणि महिलांनी या गुंडांमुळे आम्ही सर्वजण भयभीत झालो असून जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आमच्यावर आली आहे. लहान मुले, वृद्ध महिलांना मारहाण करणाऱ्या या गुंडांवर पोलिसांनी कडक कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

रिक्षाचालक, मजूर, जरी काम करणारे कामगार या परिसरात राहतात. या लोकांचे कोणाशीही वैर नसताना केवळ दहशत पसरवण्यासाठी स्थानिक लँड माफिया टोळीतील गुंडांनी हा हल्ला केला आहे. या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी सय्यदनगर परिसरातील नागरिकांनी आणि दुकानदारांनी केली आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Pune