मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तालिबानी राजवटीची पहिली झलक: कंदाहारमधील TV आणि RADIO वरील संगीत बंद, महिलांना घरचा रस्ता

तालिबानी राजवटीची पहिली झलक: कंदाहारमधील TV आणि RADIO वरील संगीत बंद, महिलांना घरचा रस्ता

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता कंदाहारमधील (Kandahar) टीव्ही आणि रेडिओ स्टेशनवर (TV and Radio Stations) बंधनं (restrictions) लादण्यात आली आहेत.

  • Published by:  desk news

काबुल, 29 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता कंदाहारमधील (Kandahar) टीव्ही आणि रेडिओ स्टेशनवर (TV and Radio Stations) बंधनं (restrictions) लादण्यात आली आहेत. कंदाहारमधील सर्व टीव्ही वाहिन्या आणि रेडिओवरील संगीत बंद करण्यात आलं आहे. तर या सर्व स्टेशन्सवरून यापुढे एकाही महिलेचा आवाज ऐकू येता कामा नये, असा फतवा तालिबाननं काढला आहे. त्यामुळे तालिबानी सत्तेची झलक दिसायला सुरुवात झाली आहे.

तालिबानी कायदे राबवायला सुरुवात

तालिबानची अफगाणिस्तानमध्ये सत्ता येताच अनेक टीव्ही वाहिन्या आणि रेडिओ स्टेशन्सनी महिलांना नोकरीवरून कमी करायला सुरुवात केली होती. आता तालिबानने अधिकृतरित्या टीव्ही आणि रेडिओवरून महिलांचे आवाज ऐकू येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे शरिया कायद्यानुसार संगीत ऐकणं पाप असल्याचं सांगत रेडिओ आणि टीव्हीवरील संगितालादेखील मनाई केली आहे. त्यामुळे कंदाहारमधील रेडिओ आणि टीव्हीवरून संगीत ऐकू येणं, आता पूर्णपणे बंद झालं आहे.

तालिबानने फिरवला शब्द

महिलांच्या काम करण्यावर कुठलीही बंधने असणार नाहीत, असं आश्वासन तालिबानने दोन आठवड्यांपूर्वीच दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती तशी नसल्याचं चित्र आहे. रेडिओ आणि टीव्हीवर महिलांनी काम करू नये, असे आदेश जरी तालिबाननं काढले नसले, तरी महिलांचे आवाज त्यावरून ऐकू येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणं महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी कामावर जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.

हे वाचा -हिंदुत्ववादी संघटनेकडून डोसा सेंटरची तोडफोड, ECONOMIC JIHAD चा आरोप

पहिले पाढे पंचावन्न

तालिबानची यापूर्वी 1996 मध्ये सत्तेत आलं होतं, त्यावेळीदेखील त्यांनी महिलांवर कडक निर्बंध लादले होते. महिलांनी चेहरा झाकूनच घराबाहेर पडणे, पुरुष नातेवाईक असल्याशिवाय एकटीनं बाहेर न पडणे, महिलांनी 12 व्या वर्षानंतर शिक्षण न घेणे, नोकरी न करणे असे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्याचप्रमाणे संगीत आणि इतर मनोरंजनालादेखील मनाई होती.

First published:

Tags: Afghanistan, Taliban, Women