मथुरा, 29 ऑगस्ट : मुस्लीम (Muslim) व्यक्ती हिंदू (Hindu) नाव वापरून डोसा सेंटर (Dosa Center) चालवत असल्याच्या रागातून एका हिंदुत्ववादी संघटनेने (Hindu organization) तोडफोड (Vandalize) केल्याची घटना समोर आली आहे. हिंदूंना आकर्षित करण्यासाठी असे प्रकार वाढत चालल्याचा दावा करत या संघटनेनं डोसा सेंटरवर तोडफोड करत तिथले बोर्ड आणि बॅनर फाडून टाकले.
काय होता आक्षेप?
मथुरेत श्रीनाथ डोसा सेंटर या नावाने गेल्या 5 वर्षांपासून काही तरूण डोसा विकण्याचं काम करतात. या व्यक्ती मुसलमान असताना त्यांनी ‘श्रीनाथ’ हे हिंदू नाव वापरण्याला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नावाच्या संघटनेच्या तरुणांनी आक्षेप घेतला. काही तरूण या डोसा सेंटरवर चालून गेले आणि त्यांनी तोडफोड केली. हिंदूंना आकर्षित करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हे नाव वापरण्यात येत असल्याचा दावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.
इकॉनॉमिक जिहाद
तोडफोड करणाऱ्या गटाचं नेतृत्व करणाऱ्या देवराज पंडितने या प्रकाराला इकॉनॉमिक जिहाद असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना आकर्षित करण्यासाठी जाळं विणलं जातं, त्याचप्रमाणं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिंदू नावांचा वापर हे तरुण करत असल्याचा दावा त्याने केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे वाचा - भर रस्त्यात हंगामा! किन्नरांनी केली ज्येष्ठ नागरिकाची धुलाई
गैरसमजातून हल्ला
इरफान नावाच्या तरुणाने आपल्या डोसा सेंटरचं नाव श्रीनाथ का ठेवलं, याची विचारणा त्याच्याकडे काहीजणांनी केली. त्याने याबाबत पोलिसांना दिलेल्या जबानीतून नवीनच माहिती समोर आली आहे. वास्तविक, या डोसा सेंटरच्या मालकाचे नाव राहुल असे असून त्याने आपल्याला हा स्टॉल चालवण्यासाठी दिला असल्याची प्रतिक्रिया मुस्लीम तरूणाने दिली आहे. आपण 400 रुपये रोजंदारीवर इथे काम करत असून नावाच्या मुद्द्यावरून काही वाद होऊ शकतात, याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती, असं त्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, अलिशान जाफरी या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार तरुणांनी आता या डोसा सेंटरचं नाव बदललं असून ते ‘अमेरिकन डोसा’ असं केल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Hindu, Muslim, Uttar pardesh