नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारत आणि अफगाणिस्तादरम्यान विमानसेवा पुन्हा सुरु (Taliban appeals India to resume air services as before in Afghanistan) करण्यात यावी, असं पत्र तालिबान सरकारकडून भारत सरकारला पाठवण्यात आलं आहे. अफगाणिस्तानच्या विमान वाहतूक खात्याचे (Afghanistan civil aviation minister writes letter to India) मंत्री हमीदुल्लाह अखुनजादा यांनी भारताच्या विमान उड्डाण खात्याचे महासंचालक अरुण कुमार यांना पत्र पाठवून ही विनंती केली आहे. भारतानं या पत्राला अद्याप कुठलंही उत्तर दिलेलं नसून विमानसेवा सुरु करण्याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू आहे.
भारतानं केली होती सेवा बंद
15 ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर भारत सरकारच्या वतीनं अफगाणितानला जाणारी सर्व उड्डाणं बंद केली होती. केवळ अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी विमानं पाठवण्यात येत होती. मात्र अमेरिकेचा काबुल विमानतळावर ताबा असेपर्यंतच ही सेवा सुरु ठेवण्यात आली होती. अमेरिकी सैनिकांनी ज्या दिवशी काबुल विमानतळाचा ताबा सोडला, त्या दिवसापासून भारतानं अफगाणिस्तानला जाणारी विमानसेवा बंद केली होती.
काय लिहिलं पत्रात?
अखुनजादा यांनी डीजीसीएला लिहिलेल्या पत्रात अमेरिकेनं काबुल विमानतळाचं प्रचंड नुकसान केल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनं आपल्या ताब्यात असणाऱ्या या विमानतळाची अतोनात हानी केली आणि त्याचं मोठं नुकसान अफगाणिस्तानला सोसावं लागलं. अमेरिकी सैन्याने पूर्ण माघार घेतल्यानंतर 30 ऑगस्टला हे विमानतळ अफगाणिस्तान सरकारनं ताब्यात घेतलं. भारताला जाणारं शेवटचं उडाण या विमानतळावरून झालं ते 21 ऑगस्ट या दिवशी. एअर इंडियाच्या विमानानं पहिल्यांदा दुशांबे आणि त्यानंतर नवी दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं.
हे वाचा - ते एक विधान भोवलं; पाकिस्तानात मुख्याध्यापिकेला फाशीची शिक्षा, काय आहे प्रकरण?
विमानतळाची जबाबदारी कतारकडे
तालिबानने काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखभालीची जबाबदारी कतारकडे सोपवली असून आता परिस्थिती पूर्ववत होत असल्याचं म्हटलं आहे. भारताने अद्याप तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे या देशात विमानसेवा सुरु करण्याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Air india, Taliban