• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • तालिबान करणार पाकिस्तानी चलनाचा स्वीकार, पाक सरकार अफगाणिस्तानला पाठवणार टीम

तालिबान करणार पाकिस्तानी चलनाचा स्वीकार, पाक सरकार अफगाणिस्तानला पाठवणार टीम

तालिबानीला (Taliban) पाकिस्ताननं (Pakistan) सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे.

 • Share this:
  अफगाणिस्तान, 10 सप्टेंबर: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानीला (Taliban) पाकिस्ताननं (Pakistan) सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे तालिबान पाकिस्तानला आपलं दुसरं घर असल्याचं बोलत आहे. आता पाकिस्ताननं अफगाणिस्तानसोबत स्वतःच्या चलनात (Rupee) व्यापार सुरू करण्याविषयी भाष्य केलं आहे. गुरुवारी पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री शौकत तारिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानी चलनात व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे. तारिन म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये डॉलरची कमतरता आहे. त्यामुळे पाकिस्तान स्वतःच्या चलनात व्यापार करेल. अखेर तालिबाननं दाखवलं आपलं खरं रुप, महिलांच्या खेळांवर बंदी पाकिस्तान पाठवणार आपली टीम शौकत म्हणाले, अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे.अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास मदत करण्यासाठी पाकिस्तान तेथे एक टीम पाठवणार आहे. सुरक्षा दलाची झाली चूक, माओवादी समजून निष्पापांना झाडल्या गोळ्या; 8 वर्षांनंतर खुलासा  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्थांनी अफगाणिस्तानला निधी देणे बंद केले आहे आणि तिची मालमत्ता गोठवली आहे, ज्यामुळे तालिबान सध्या आर्थिक संकटाला सामोरं जात आहे. दरम्यान पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती देखील फारशी चांगली नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री तारिन म्हणाले की, पाकिस्तानला काही आठवड्यांत अफगाणिस्तानबरोबरच्या व्यापाराचं परिणाम दिसू लागतील. सरकारला चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची जीडीपी 4 टक्क्यांवरून 4.8 टक्के करायची आहे. सध्या एका डॉलरची किंमत 169 पाकिस्तानी रुपये आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: