जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ऐकावं तेवढं नवलच! चक्क स्वतःचा घाम विकून TV स्टार कमावतेय लाखो रुपये; फॅन्सही आहेत घामवेडे

ऐकावं तेवढं नवलच! चक्क स्वतःचा घाम विकून TV स्टार कमावतेय लाखो रुपये; फॅन्सही आहेत घामवेडे

Stephanie Matto

Stephanie Matto

याआधी स्टेफनीने तिच्या पोटातील गॅस छोट्या बाटलीत साठवून तो विकून लाखो डॉलरची कमाई केली होती; पण आता घाम विकून पैसे कमावताना दिसत आहे.

    मुंबई, 01 जून :  पोटातील गॅस (Fart) बाटलीत साठवून लाखो डॉलरमध्ये विक्री करणारी सेलेब्रिटी आता स्वेट गर्ल (Sweat Girl) बनली आहे. पैसे कमवण्यासाठी तिने एक नवीन शक्कल लढवली आहे. कडाक्याच्या उन्हात येणारा घाम बाटलीत काढून त्याची विक्री करणं सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, तिच्या एक बाटली घामाची किंमत 40 हजार रुपयांपर्यंत आहे. दिवसाला 4 लाखांपर्यंत ती कमाई करत आहे. स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) असं घाम साठवून विकणाऱ्या सेलेब्रिटीचं नाव आहे. ती अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये राहते. याआधी स्टेफनीने तिच्या पोटातील गॅस छोट्या बाटलीत साठवून तो विकून लाखो डॉलरची कमाई केली होती; पण आता घाम विकून पैसे कमावताना दिसत आहे. ‘आज तक हिंदी’ने दिलेल्या वृत्तात स्टेफनीच्या नवीन व्यवसायाची माहिती देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून 31 वर्षीय स्टेफनीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. आता नवीन व्यवसायाच्या निमित्ताने तिच्याबद्दल खूप बोललं जात आहे. घाम विक्रीच्या नवीन व्यवसायाबद्दल बोलताना स्टेफनी म्हणाली की, भर उन्हात जेव्हा स्विमिंग पूलशेजारी मी काही वेळ घालवते तेव्हा 15 मिनिटांतच घामाने एक जार भरून जातो. ऊन जेव्हा वाढतं तेव्हा मात्र केवळ तेवढीच बाटली भरण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी लागतो. 40 हजार रुपयांमध्ये एका बाटलीची विक्री होत असून, दररोज आपली 4 लाख रुपयांवर कमाई होत असल्याचा दावा स्टेफनीने केला. पुन्हा अमेरिका हादरलं..! भर फेस्टिव्हलमध्ये गोळीबाराचा थरार, महिलेचा मृत्यू

    घाम साठवण्याठी लागते खूप मेहनत आपल्या घाम विक्रीच्या व्यवसायाचं गुपित शेअर करताना स्टेफनी म्हणाली की, शरीरात घामाची निर्मिती व्हावी म्हणून मला खूप मेहनत घ्यावी लागते. तास तासभर स्विमिंग पूलजवळ बसावं लागतं. घाम साठवण्यासाठी स्टेफनी जास्तीतजास्त पाणी पिते. स्वत:ला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे तिला अधिक घाम येतो. दिवसभर उन्हात बसणं धोकादायक ठरू शकतं, याची कल्पना असल्याने ती आवश्यक ती सर्व काळजी घेत असते.

    फार्ट विकून सर्वप्रथम आली चर्चेत 31 वर्षीय स्टेफनी सर्वप्रथम आपल्या पोटातला गॅस विकून सर्वाधिक चर्चेत आली होती. अनेक दिवस तिने हा व्यवसाय सुरू ठेवला. यातून लाखो डॉलर्सची कमाईही तिला करता आली. पण सातत्याने हे काम करणं तिच्या शरीराला अपायकारक ठरलं. तिच्या छातीत वेदनाही जाणवू लागल्या होत्या. डॉक्टरांकडे नेल्यानंतर तिला हृदयविकाराचा इशारा देण्यात आला. काही दिवस ती रुग्णालयातही दाखल झाली होती. यानंतर तिने ते काम सोडून दिलं. इराणने डोंगराखाली चक्क बोगदे बनवून लपवलेत प्राणघातक हल्ला करणारे ड्रोन! घामामुळे फॅन्सना माझा सहवास लाभल्याचा आनंद मिळेल स्टेफनीचा घाम कोण व का विकत घेईल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण त्याचं उत्तर देताना ती म्हणते की, ‘माझे अनेक चाहते आहेत. घाम विकत घेऊन त्यांना काय मिळेल? असा प्रश्न निर्माण होत असला तरी, घामाच्या सुगंधापासून माझा सहवास लाभल्याचा आनंद फॅन्सना मिळू शकेल. दरम्यान, घाम साठवून विकण्याचा नवीन व्यवसाय सुरू करताना शरीराला कुठलाही धोका होऊ नये, यासाठी आपण पुरेपुर काळजी घेत असल्याचे स्टेफनी म्हणते. स्मार्ट होण्यासाठी सुरुवात आपण संथ करत असल्याचंही तिने फॅन्सना सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात