जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ‘खलिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देत ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

‘खलिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देत ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

भारतीय विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला

भारतीय विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी या घटनेची नोंद घेतलीय. पोलिसांनी हल्ल्यामध्ये गंभीर जखमी जालेल्या भारतीय विद्यार्थ्याला वेस्टमीड रुग्णालयात नेलं.

  • -MIN READ Trending Desk Delhi Cantonment,New Delhi,Delhi
  • Last Updated :

    न्यू साउथ वेल्स : ऑस्ट्रेलियामध्ये एका विद्यार्थ्यावर खलिस्तान समर्थकांनी अचानकपणे हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लोखंडी रॉडने सदर विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर हे ‘खलिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देत होते, असा पीडित विद्यार्थ्याचा आरोप आहे. या घटनेवरून खलिस्तान समर्थकांनी परदेशात भारतीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचं समोर आलंय. ऑस्ट्रेलियातील 23 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला खलिस्तान समर्थकांनी खलिस्तानी अतिरेकी कारवायांचा विरोध केल्यानं लोखंडी रॉडनं मारहाण केली. ही घटना वेस्टमीड, पश्चिम सिडनी येथे शुक्रवारी (14 जुलै 2023) पहाटेच्या सुमारास घडली. सदर विद्यार्थी कामावर जात असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला, असं वृत्त ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’नं दिलंय. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी या घटनेची नोंद घेतलीय. पोलिसांनी हल्ल्यामध्ये गंभीर जखमी जालेल्या भारतीय विद्यार्थ्याला वेस्टमीड रुग्णालयात नेलं. सदर विद्यार्थ्याच्या डोक्याला, पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, ‘पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे की, एक 23 वर्षीय व्यक्ती रुपर्ट रस्त्यावरून चालत होती. तिच्यावर धातूच्या रॉडसह आलेल्या सशस्त्र चार जणांनी हल्ला केला.’ दुसरीकडे मेरीलँड्सचे खासदार म्हणाले, ‘आमच्या स्थानिक समुदायात अतिरेकी किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. या घटनेबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे, आणि परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे.’

    आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याची भीती; छ. संभाजीनगरमधील 38 वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

    नेमकं काय घडलं? ‘कामावर जात असताना माझ्यावर हल्ला करण्यात आला,’ असं पीडित मुलानं सांगितलं आहे. तो पुढे म्हणाला, ‘आज (शुक्रवारी) सकाळी साडेपाच वाजता मी कामावर जात असताना, चार ते पाच खलिस्तान समर्थकांनी माझ्यावर हल्ला केला. मी माझ्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसताच, हे खलिस्तान समर्थक अचानक समोर आले. त्यापैकी एकाने माझ्या गाडीच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि माझ्या डाव्या डोळ्याखाली माझ्या गालाच्या हाडावर लोखंडी रॉड मारला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नंतर त्यांनी मला गाडीतून बाहेर ओढले, व लोखंडी रॉडनं मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी दोन हल्लेखोर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. माझ्यावर हल्ला करणारे हल्लेखोर सतत ‘खलिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देत होता. सर्व काही पाच मिनिटांत घडले. स्वतंत्र खलिस्तानच्या मुद्द्याला विरोध केल्यामुळे माझ्यासाठी हा धडा आहे. तसंच येथून पुढेही खलिस्तानच्या मुद्दयाला विरोध केल्यास आणखी धडे देऊ, असा दमही त्यांनी भरला, व त्यानंतर ते निघून गेले.’

    दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात घातली कुऱ्हाड, छ. संभाजीनगर हादरलं

    वारंवार होतोय संघर्ष? जानेवारीमध्ये तथाकथित ‘पंजाब स्वातंत्र्य सार्वमत’ दरम्यान मेलबर्नमध्ये खलिस्तानी कार्यकर्ते आणि भारत समर्थक निदर्शकांमध्ये संघर्ष झाला होता. भारतानं ऑस्ट्रेलियन सरकारकडे खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या भारतविरोधी कारवाया आणि देशातील हिंदू मंदिरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच नवी दिल्लीत सांगितलं होतं की, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या किंवा दहशतवादाला कायदेशीर मान्यता देणार्‍यांना जागा देऊ नये. काही देशांमध्ये खलिस्तानी गटांच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत.’ त्यातच आता ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तान समर्थकांकडून हल्ला घडल्याची घटना घडली असून त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात