जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Farmer Suicide: आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याची भीती; छ. संभाजीनगरमधील 38 वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

Farmer Suicide: आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याची भीती; छ. संभाजीनगरमधील 38 वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला होता. दरम्यान आता घोटाळ्यात पहिला बळी गेला आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर 15 जुलै : कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे अनेक शेतकरी आधीच हैराण आहेत. अशातच आणखी काही संकटं आली की शेतकरीही पूर्णपणे खचून जातो. या नैराश्यात काहीवेळा बळीराजा टोकाचं पाऊलही उचलतो. सध्या छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला होता. दरम्यान आता घोटाळ्यात पहिला बळी गेला असून, एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथे घडली आहे. Chhatrapati Sambhaji nagar News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात घातली कुऱ्हाड, छ. संभाजीनगर हादरलं रामेश्वर नारायण इथर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे नऊ लाख रुपये आणि मुलगी अश्विनी हिच्या नावे पाच लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ही रक्कम एकूण 22 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. मात्र पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला. यानंतर पैसे बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात