जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं

6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं

6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं

खलाशांचं नशीब चांगलं होतं. ही बाटली लवकरच एका मच्छिमाराच्या हाती लागली. त्याने ती ब्राझीलच्या नौदलाकडे सुपूर्द केली. यानंतर 13 एप्रिलला या लोकांना वाचवण्यात यश आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 एप्रिल : एका दुर्गम बेटावर 6 जण अडकले. जवळजवळ दोन आठवडे अन्नाशिवाय आणि मदतीसाठी ते तिथं अडकले होते. आपल्या बेपत्ता झाल्याची बातमी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी चक्क बाटलीचा वापर केला. सुदैवानं यामध्ये ते यशस्वी झाले. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी त्यांना वाचवलं. ही घटना अगदी फिल्मी वाटते. पण ती खरी आहे. हे सर्व लोक बॉम जीझस जहाजाचे (Bom Jesus ship) क्रू मेंबर होते. हे लोक बेपत्ता झाल्याचे 11 एप्रिलला समोर आलं. कारण 10 दिवसांच्या सागरी प्रवासानंतर ते परत येऊ शकले नव्हते. हा गट 1 एप्रिलला इल्हा दास फ्लेचास (ऐरो बेट) नावाच्या बेटावर अडकला होता. कारण या लोकांच्या जहाजाला आग लागली होती.

जाहिरात

लोकवस्ती नसलेल्या या बेटातून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यांनी एक चिठ्ठी लिहून बाटलीत टाकली आणि रबरी फ्लोटरने बांधली. ती वाहत जाऊन आपला संदेश लोकांना मिळेल या आशेने त्यांनी ती बाटली समुद्रात सोडली.

सीईएन न्यूज वायरच्या (CEN News Wire) वृत्तानुसार, बाटलीच्या आत लिहिलेली चिठ्ठी होती- Help, help! आम्हाला मदत हवी आहे, आमच्या बोटीला आग लागली. आम्ही ऐरो बेटावर 13 दिवस अन्नाशिवाय अडकलो आहोत. कृपया आमच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती द्या. चिठ्ठीवर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबरही लिहिले होते. हे वाचा -  रशियानं ‘मोस्कवा’च्या विनाशाचा घेतला बदला, ‘नेपच्यून’ निर्मितीचा प्लँटच उडवला खलाशांचं नशीब चांगलं होतं. ही बाटली लवकरच एका मच्छिमाराच्या हाती लागली. त्याने ती ब्राझीलच्या नौदलाकडे सुपूर्द केली. यानंतर 13 एप्रिलला या लोकांना वाचवण्यात यश आलं. त्यानंतर बेलेम शहरात (city of Belém) त्या 6 लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जिथं डॉक्टरांनी त्यांना ते सर्वजण निरोगी असल्याचं सांगितलं. ब्राझीलच्या नौदलानेही बचावकार्याचे फोटो शेअर केले आहेत. हे वाचा -  रशियन सैनिकांकडून युक्रेनी महिलांवर सैतानी अत्याचार, वाचून होईल थरकाप स्थानिक माध्यमांशी केलेल्या संभाषणात, एका खलाशाच्या आईने सांगितलं - आम्ही सर्व खूप आनंदी आहोत कारण तो जिवंत परत आला आहे. त्याचवेळी बंदर प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात