Home /News /videsh /

रशियन सैनिकांकडून युक्रेनी महिलांसोबत सैतानी कृत्य, अत्याचारांबद्दल वाचलं तरी होईल थरकाप

रशियन सैनिकांकडून युक्रेनी महिलांसोबत सैतानी कृत्य, अत्याचारांबद्दल वाचलं तरी होईल थरकाप

Russia-Ukraine War News: रशियन सैनिकांनी 23 वर्षांच्या मुलीला पळवून नेलं. तिच्यावर बलात्कार करून नंतर डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. नंतर मुलीचा मृतदेह बुचामध्ये मृतदेहांच्या ढिगाऱ्यात सापडला. या मृतदेहाचा केवळ वरचा अर्धा भाग मिळाला आहे. डोक्याचे दोन तुकडे झाले आहेत.

पुढे वाचा ...
    कीव, 15 एप्रिल : रशिया आणि युक्रेन यांच्यात 52 दिवस भयंकर युद्ध (Russia-Ukraine War) सुरू आहे. सुरुवातीला रशिया युक्रेनला एका फटक्यात गुडघे टेकायला भाग पाडेल, असं वाटत होतं. मात्र, रशियाला युक्रेनच्या लष्कराकडून कडवा संघर्ष झेलावा लागत आहे. या युद्धाच्या काळात रशियन सैनिकांच्या क्रूरतेच्या बातम्याही समोर येत आहेत. कीवमध्ये राहणार्‍या एका जोडप्यानं सांगितलं की, इथे झालेल्या गोळीबारादरम्यान रशियन सैनिकांनी त्यांच्या 23 वर्षांच्या मुलीला पळवून नेलं. तिच्यावर बलात्कार करून नंतर डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नंतर मुलीचा मृतदेह बुचामध्ये मृतदेहांच्या ढिगाऱ्यात सापडला. या मृतदेहाचा केवळ वरचा अर्धा भाग मिळाला आहे. डोक्याचे दोन तुकडे झाले आहेत. बुचा येथे रशियन सैनिकांच्या हत्याकांडाचे (Bucha Massacre) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याचा आरोप आहे की, सुमारे 4 आठवड्यांपूर्वी या मुलीला रशियन सैनिक घेऊन गेले होते. बलात्कारासोबतच त्यांनी तिच्यावर खूप अत्याचार केले होते, त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमेच्या खुणा आढळल्या होत्या. तिची नखेही उपटली होती. या जोडप्यानं सांगितलं की, मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रशियन सैनिकांनी फेकून दिला होता. 1-2 दिवसांनंतर त्याचा मृतदेह बुचा शहरातील एका घराच्या मागे पडलेला आढळला. तिथे इतर मृतदेह पडलेले होते. काही मृतदेह कुजले होते. डोक्यात झाडल्या गोळ्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, रशियन सैनिकांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर पॉइंट ब्लँक रेंजवर गोळ्या घातल्या. त्यामुळे तिच्या डोक्याचे दोन तुकडे झाले. नंतर कसा तरी त्याचा मृतदेह सापडला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वाचा - जगभरातून चीनचा निषेध; श्रीलंका, पाकिस्तान भोगताहेत चीनच्या कर्जाची फळं? शरीरावर अनेक जखमा वडिलांचं म्हणणं आहे की, 'मुलीच्या शरीरावर ज्या प्रकारे जखमा आढळल्या आहेत, त्यावरून तिच्या बलात्कार झाल्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र, आम्ही शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. शत्रूंनी तिचे हातही जाळले. त्यातली हाडे स्पष्ट दिसत होती. खालचं शरीर आढळलं नाही वडील म्हणाले, 'आम्हाला तिच्या शरीराचा खालचा भाग मिळाला नाही. फक्त वरचा भाग मिळाला आहे. परंतु, आम्हाला वरच्या भागाची जी स्थिती दिसत आहे, त्यावरून तिच्या शरीराच्या इतर भागाचं काय झालं असेल, याची आपण कल्पना करू शकतो.' वडील पुढे म्हणाले, 'माझ्या मुलीच्या हाताची कातडी पूर्णपणे जळाली आहे. तिच्या एका बोटात चांदीची अंगठी होती. तिथून तिची हाडे स्पष्ट दिसत होती. हे वाचा - जगातल्या या देशात सलग 13व्या वर्षी दुष्काळ, पाणी मिळतंय रेशनिंगवर PHOTOS 25 मुलींवर अनेकवेळा झाला बलात्कार बुचा शहरातील एका घराच्या तळघरात रशियन सैनिकांनी युक्रेनियन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. युक्रेनच्या मानवाधिकार लोकपाल ल्युडमिला डेनिसोवा यांनी बीबीसीला सांगितलं, 'बुचा येथील एका घराच्या तळघरात 14 ते 24 वयोगटातील सुमारे 25 मुली आणि महिलांवर बलात्कार करण्यात आला. त्यापैकी नऊ आता गरोदर आहेत.' 'या महिलांनी सांगितलं की, रशियन सैनिकांनी त्यांना म्हटलं की, ते त्यांच्यावर इतक्या वेळा बलात्कार करतील की, यानंतर त्या कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवू शकणार नाहीत. त्यामुळे त्या युक्रेनियन मुले जन्माला घालू शकणार नाहीत,' असं ल्युडमिडा यांनी सांगितलं. या महिलांच्या जीवनाबद्दलच्या सर्व स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. 400 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले बुचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांच्या म्हणण्यानुसार, बुचामध्ये 400 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. याव्यतिरिक्त, युक्रेनमध्ये सुमारे 5,000 रशियन युद्ध गुन्ह्यांची (War crimes) चौकशी सुरू आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin, War

    पुढील बातम्या