जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, पुण्याशी आहे जवळचा संबंध

शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, पुण्याशी आहे जवळचा संबंध

शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, पुण्याशी आहे जवळचा संबंध

Shivaji Maharaj Statue Stolen : छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला गेला आहे. या पुतळ्याचा पुण्याशी जवळचा संबंध आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 8 फेब्रुवारी :  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भावना निर्माण केली होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यांच्या पराक्रमाची कीर्ती जगभरात पसरलेली आहे. परदेशात अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे आणि त्यांच्या विषयीचं साहित्य उपलब्ध आहे. उत्तर अमेरिका खंडामध्येही त्यांचा एक पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून हा पुतळा चोरीला गेला आहे. उत्तर अमेरिकेत अस्तित्त्वात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पुण्याशी जवळचं कनेक्शन महाराष्ट्रातील पुणे शहराला सॅन जोस शहराची ‘सिस्टर सिटी’ मानलं जातं. सॅन जोसला पुणे शहराकडूनच हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा हा संपूर्ण उत्तर अमेरिका खंडातील एकमेव पुतळा होता. हा पुतळा नेमका कधी चोरी झाला हे स्पष्ट झालेलं नाही, असं वृत्त ‘केटीव्हीयू’नं प्रसिद्ध केलं आहे. Video : विमानात खिडकीजवळ बसण्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, प्लेनला 2 तास उशीर सॅन जोसमधील पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसनं शुक्रवारी याबाबत ट्विट केलं आहे. “आमच्या नागरिकांना कळवताना आम्हाला खेद वाटत आहे की, ग्वाडालुप रिव्हर पार्क येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीसा झाला आहे,” असं ट्विट करण्यात आलं आहे. “शहरातील हा लँडमार्क चोरीला गेल्याचं खूप दुःख आहे. आम्ही उपाय शोधण्यासाठी कम्युनिटी नेत्यांसोबत काम करत आहोत. आम्हाला त्याबाबत काही माहिती मिळाल्यास आम्ही नागरिकांना कळवू,” असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी अधिकारी करत आहेत. त्यांनी लोकांकडून मदत मागितली आहे, असं पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेस विभागानं सांगितलं आहे. धरतीवरील संकटाचे आकाशात मिळाले होते संकेत; Turkey Earthquake आधीचा ‘तो’ Video Viral अमेरिका आणि शिवाजी महाराजांचा थेट संबंध आला नसला तरी अमेरिकेला त्यांच्या पराक्रमाची जाणीव आहे. कारण, अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धात, मुठभर व्हिएतनाम सैन्यानं अमेरिकेला सळो की पळो करून सोडलं होतं. व्हिएतनामच्या नेत्यांनी आणि सैन्यानं शिवाजी महाराजांकडून गनिमी काव्याची प्रेरणा घेतली होती, असं म्हटलं जातं. व्हिएतनाममध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. विशेष म्हणजे, हा पुतळा तेथील माजी राष्ट्रपतींच्या समाधी परिसरात उभारला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात