मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : विमानात खिडकीजवळ बसण्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, प्लेनला 2 तास उशीर

Video : विमानात खिडकीजवळ बसण्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, प्लेनला 2 तास उशीर

विमानात दोन कुटुंबाचा राडा

विमानात दोन कुटुंबाचा राडा

बस, रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही अनेकदा जागेसाठी भांडण झालेलं पाहिलं असेल. मात्र इथे चक्क दोन कुटुंबात विमानात खिडकीजवळ बसायला मिळावे यासाठी भांडण झाल्याची घटना घडली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  दिल्ली, 8 फेब्रुवारी : बस, रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही अनेकदा जागेसाठी भांडण झालेलं पाहिलं असेल. अनेकदा खिडकीजवळ बसायला जागा हवी, अशा किरकोळ कारणावरून वादाला सुरूवात होते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, किरकोळ वाटणाऱ्या या कारणामुळे विमानामध्ये जोरदार वाद झालाय. विमानामध्ये खिडकीजवळ जागा हवी, यासाठी दोन कुटुंब एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडलाय. ब्राझीलमधील ही घटना आहे.

  सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलं 

  सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओही व्हायरल झालाय. गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात मारामारी, शिवीगाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता असाच एक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ @MikeSington या ट्विट हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. विमानात खिडकीच्या सीटवरून दोन कुटुंब एकमेकांना भिडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. या वादामुळे विमानाला टेक-ऑफ करण्यास दोन तास उशीर झाला. हा वाद मिटवण्यासाठी विमानातील सर्व कर्मचारी प्रयत्न करीत होते. मात्र वाद मिटत नसल्याचं दिसून आल्यानं, दोन्ही कुटुंबांना विमानातून खाली उतरवण्यात आलं, व त्यानंतर विमानानं टेक-ऑफ केलं.

  हेही वाचा : अमरावतीच्या श्रद्धाने अमेरिकन नवऱ्याला शिकवला नागिन डान्स; 'बिलनशी नागिण निघाली' गाण्यावरील झिंगाट Video

  खिडकीच्या सीटसाठी विमानात राडा

  व्हायरल झालेला व्हिडिओ 2 फेब्रुवारी 2023 चा आहे. G-3 1659 या क्रमांकाच्या विमानातील हा व्हिडिओ आहे. या विमानात टेक-ऑफ करण्यापूर्वीच गोंधळ उडाला. विमानातच दोन कुटुंबं एकमेकांना भिडली. विमानातच आरडाओरड, शिवीगाळ करीत भांडणे सुरू झाली. सीटवर चढून लोक एकमेकांना शिव्या देत होते, भांडत होते, धक्काबुक्की करीत होते. यामध्ये महिलांचाही सहभाग होता.

  या वादाची सुरुवात विंडो सीटवरून झाल्याचं सांगण्यात आलं. एका महिलेनं तिच्या अपंग मुलासाठी एका प्रवाशाला विंडो सीट बदलण्याची विनंती केली होती. मात्र त्या प्रवासानं नकार दिला. त्यामुळे महिलेला राग आला, आणि तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या गोष्टीचे रुपांतर हाणामारीत झाले. विमानातील संपूर्ण कर्मचारी, अगदी पायलटलाही हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. परंतु वाद मिटला नाही, व त्याचा परिणाम असा झाला की विमानाला दोन तास उशीर झाला. अखेर वाद घालणाऱ्या दोन्ही कुटुंबांना विमानातून खाली उतरवण्यात आलं. विमान कंपनीनं या घटनेला दुजोरा दिला आहे.

  First published:

  Tags: Airplane