कोलंबो, 13 जुलै : श्रीलंकेतील स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lanka’s President Gotabaya Rajapaksa) हे देश सोडून पळून गेले आहेत. श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानात पत्नी आणि 2 सुरक्षा रक्षकांसह त्यांनी देश सोडला अशी माहिती मिळत आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. श्रीलंकेत प्रचंड विरोध होत असताना राष्ट्रपती गोटाबाया पत्नी आणि अंगरक्षकांसह मालदीवमध्ये पळून गेले आहेत. मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या ‘अँटोनोव्ह-32’ विमानात गोटाबाया त्यांची पत्नी आणि अंगरक्षक हे चार प्रवासी होते, असे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, राजपक्षे यांच्या मालदीवमध्ये येण्याबाबत तूर्तास कोणतीही पुष्टी झालेली नाही. इमिग्रेशन प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्या पासपोर्टवर शिक्का मारण्यात आला होता आणि तो हवाई दलाच्या विशेष विमानात बसला. श्रीलंकेत आंदोलकांचा राष्ट्राध्यक्षांचा बंगल्यावर ताबा; सरकारी निवासस्थानी ‘मॉक कॅबिनेट मीटिंग’ही घेतली गोटाबाया राजपक्षे यांना दुबईला जायचे होते परंतु बंदरनायके इंटरनॅशनलच्या कर्मचार्यांनी व्हीआयपी सेवांमधून माघार घेतली आणि सर्व प्रवाशांनी सार्वजनिक काउंटरमधून जावे असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांनी दुबईला जाता आले नाही. श्रीलंकेत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या जनक्षोभामुळे राजपक्षे यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानातून पळ काढावा लागला होता. आंदोलकांनी राजधानीतील तीन मुख्य इमारती राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान, टेम्पल ट्रीज यावर कब्जा केला आहे. राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, अशी भीती गोटाबाया राजपक्षे यांना वाटत होती. अशा परिस्थितीत त्यांनी हवाई दलाच्या विशेष विमानाने देशाबाहेर पलायन केले. श्रीलंका 70 वर्षांतील सर्वात वाईट आर्थिक संकटात कसा बुडाला? एका कुटुंबाने कशी लावली देशाची वाट?
श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली
श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गगनाला भिडणाऱ्या भाज्यांच्या किमती श्रीलंकेच्या ग्राहकांच्या खर्चात वाढ करत आहेत. 1948 मध्ये श्रीलंका स्वतंत्र झाला. त्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.