Home /News /videsh /

Sri Lanka Economic crisis: चीनच्या कर्जामुळे मोडलं अर्थव्यवस्थेचं कंबरडं, चहा पिणंही न परवडणारं

Sri Lanka Economic crisis: चीनच्या कर्जामुळे मोडलं अर्थव्यवस्थेचं कंबरडं, चहा पिणंही न परवडणारं

भारताचा शेजारी देश असणाऱ्या श्रीलंकेत महागाईने (Sri Lanka inflation) उच्चांक गाठला आहे. नागरिकांना तीन वेळेचं जेवण सोडा, दुधाचा चहादेखील मिळणं अवघड झालं आहे.

मुंबई, 12 जानेवारी: कोरोनामुळे जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला. परिणामी ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग पर्यटनावर आधारित आहे; त्या देशांची परिस्थिती बिकट झाली आहे. आपला शेजारी देश श्रीलंकाही (Sri Lanka Economic crisis) याला अपवाद नाही. अर्थव्यवस्थेची मोडलेली कंबर, आणि त्यातच परदेशी कर्जाचं (Sri Lanka foreign loan) ओझं, यामुळे श्रीलंकेचं दिवाळं निघालं आहे. देशात महागाईने (Sri Lanka inflation) उच्चांक गाठला आहे. नागरिकांना तीन वेळेचं जेवण सोडा, दुधाचा चहादेखील मिळणं अवघड झालं आहे. भाज्या महागल्या, सिलेंडरची किंमतही दुप्पट सुमारे 2.2 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात अभूतपूर्व असे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशातील खाण्या-पिण्याच्या गोष्टी प्रचंड महागल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार भाज्या, दूध अशा गोष्टींच्या किंमतींमध्ये (Sri Lanka vegetable rate) एका महिन्यात तब्बल 15 टक्के वाढ झाली आहे. अवघ्या 100 ग्रॅम मिरचीसाठी नागरिकांना 71 रुपये मोजावे लागत आहेत. वांगी 51 टक्के, कांदा 40 टक्के, तर टोमॅटो 10 टक्के महागला आहे. एक किलो बटाटा हा तब्बल 200 रुपयांना मिळतो आहे. तर, चारच महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची (Gas Cylinder rates doubled) किंमतही दुप्पट झाली आहे. यामुळे घरोघरी आता पुन्हा चुली पेटताना दिसून येत आहेत. हे वाचा-रशियन सैन्याचा कझाकिस्तानमधील मुक्काम वाढला, पुतीन यांच्या वक्तव्याने नवी चर्चा वाढत्या महागाईमुळे लोकांना तीन वेळचं जेवण मिळणंही अवघड झालं आहे. देशाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी (Economic Emergency in Sri Lanka) लागू केली आहे. साठेबाजी होऊ नये, तसेच सरकारी दरांपेक्षा चढ्या दराने वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी सैन्यातील जवानांना ठिकठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. चहा देखील महागला 2021च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत श्रीलंकेचे परदेशी चलन भांडार (Foreign currency reserves) हे केवळ 1.6 अब्ज डॉलर एवढेच राहिले होते. आता देशात पुढील काही आठवडे आयात करण्यासाठी पैसे शिल्लक आहेत. याचाच फटका मिल्क पावडर (Milk Powder rate in Sri Lanka) आयातीलाही बसला आहे. आयात होत नसल्यामुळे देशातील दूध पावडरच्या किंमती 12.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे कॅफे ओनर्स असोसिएशनने दुधाचा चहा (Milk tea is luxury in Sri Lanka) बनवणे बंद केले आहे. केवळ मागणीनुसार, आणि जास्त दराने दुधाचा चहा ग्राहकांना दिला जातो आहे. श्रीलंकेतील विरोधी पक्ष प्रमुख आणि अर्थतज्ज्ञ हर्षा डिसिल्वा यांनी सांगितले, की लवकरच यावर काही उपाय केला गेला नाही; तर देश कंगाल होईल. आयात पूर्णपणे थांबेल, आणि आयटी सेक्टरही पूर्णपणे ठप्प होईल. सध्या देश गुगल मॅप्सचे पैसे देण्याच्या स्थितीमध्येही नाही. त्यामुळे देशातील गुगल मॅप्सची सेवादेखील बंद होऊ शकते, असेही हर्षा म्हणाले. हे वाचा-Crypto संस्थापक झाला जगातल्या सर्वात श्रीमंतांपैकी एक; असा घडला प्रवास चीनचे कर्ज प्रमुख कारणांपैकी एक श्रीलंकेची अशी स्थिती होण्यासाठी जसा कोरोना कारणीभूत आहे, तसंच चीनकडून घेतलेलं कर्जही (Sri Lanka under China’s debt) प्रमुख कारण आहे. चीनकडून श्रीलंकेने आधीच पाच अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं. त्यात गेल्या वर्षी आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आणखी एक अब्ज डॉलर्सचं कर्ज श्रीलंकेनी चीनकडून घेतले. चीन आणि इतर देशांचं मिळून येत्या वर्षभरात श्रीलंकेला तब्बल 7.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडायचं आहे. तसंच, जानेवारी 22 मध्ये 50 कोटी डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय सॉवरेन बॉन्डची (Sovereign Bonds) रक्कमही श्रीलंकेला जमा करायची आहे. एकूणच, चिनी ड्रॅगनने घातलेल्या कर्जाच्या विळख्यात श्रीलंका पुरती अडकली आहे. याचा फटका श्रीलंकेतील सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. श्रीलंकेची झालेली ही परिस्थिती पाहता, चीनच्या आश्रयाला असलेल्या इतर देशांनी त्यातून धडा घेणं गरजेचं आहे!
First published:

Tags: Sri lanka

पुढील बातम्या