Home /News /videsh /

रशियन सैन्याचा कझाकिस्तानमधील मुक्काम वाढला, पुतीन यांच्या वक्तव्यानंतर नव्या चर्चेला उधाण

रशियन सैन्याचा कझाकिस्तानमधील मुक्काम वाढला, पुतीन यांच्या वक्तव्यानंतर नव्या चर्चेला उधाण

कझाकिस्तानमध्ये सर्व काही आलबेल होत नाही, तोपर्यंत आमचं सैन्य तिथेच राहिल, असं विधान रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केलं आहे. यामुळे अनेक नव्या शक्यता चर्चेत आल्या आहेत.

    मॉस्को, 11 जानेवारी: कझाकिस्तानमधील (Kazakhstan) जनउद्रेक (Rebell) शांत करून कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) पूर्ववत करण्यासाठी गेलेलं रशियन सैन्य (Russian Troops) आणखी बराच काळ तिथे राहिल, असे संकेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी दिले आहेत. कझाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती ही काही अंतर्गत आणि काही बाह्य शक्तींमुळे निर्माण झाल्याचं सांगत परिस्थिती निवळेपर्यंत आपलं सैन्य तिथेच राहणार असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कझाकिस्तानमध्ये दीर्घ मुक्काम करण्याचा पुतीन यांचा विचार सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.  काय आहे प्रकरण? वाढती महागाई आणि इंधनाचे वाढलेले दर या कारणावरून सुरू झालेल्या आंदोलनानं कझाकिस्तानमध्ये हिंसक वळण घेतलं. अनेक ठिकाणी नागरिकांनी जाळपोळ आणि हिंसाचार केल्याच्या घटना घडल्या. कझाकिस्तानची आर्थिक राजधानी असणाऱ्या अल्माटीमध्ये आंदोलनक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट राष्ट्रपतींच्या निवासस्थानालाही आग लावल्याची घटना घडली होती. अनेक सरकारी इमारती आणि महापौरांचं निवासस्थान या ठिकाणीही आगी लावण्यात आल्या. केवळ महागाईच्या कारणावरून सुरू झालेलं हे आंदोलन सरकारी नियंत्रणापलिकडे गेल्यानंतर राष्ट्रपती टोकायेव यांनी देशात आणीबाणी घोषित केली आहे. 5 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत ही आणीबाणी लागू आहे.  रशियाचा प्रवेश दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी विनंती केल्यानंतर रशियानं आपलं सैन्य मदतीसाठी पाठवून दिलं आहे. सध्या सुमारे 2000 रशियान सैनिक कझाकिस्तानच्या भूमीवर असून कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याचं काम करत आहेत.  हे वाचा - रशियाचा मुक्काम लांबणार दरम्यान, जोपर्यंत कझाकिस्तानचे राष्ट्रपती निरोप देत नाहीत आणि परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत आपलं सैन्य तिथेच राहिल, असं वक्तव्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केलं आहे. कझाकिस्तानामधील दंगलींमध्ये केवळ महागाईचा मुद्दा नाही, तर संपूर्ण परिसर अस्थिर करण्याचा परकीय शक्तींचा डाव यामागे असल्याचा दावा व्लादिमिर पुतीन यांनी केला आहे. कझाकिस्तान प्रश्नाचा वापर करत युक्रेनवर अतिक्रमण करण्याचा रशियाचा डाव आहे काय, याची चर्चाही आता सुरू झाली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: President Vladimir Putin, Russia, Ukraine news

    पुढील बातम्या