Home /News /coronavirus-latest-news /

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये Corona चं प्रमाण जास्त का? शास्त्रज्ञांना उत्तर सापडलं

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये Corona चं प्रमाण जास्त का? शास्त्रज्ञांना उत्तर सापडलं

कोरोनाव्हायरस ज्या एन्झाइम्समार्फत मानवी शरीरातील पेशीत प्रवेश करतो, ते एन्झाइम्स महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

    नवी दिल्ली, 12 मे : जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातही महिलांपेक्षा पुरुष कोरोनाग्रस्तांची संख्या आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाव्हायरसची लागण जास्त का होते आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे आणि त्याचं उत्तर आता शास्त्रज्ञांना सापडलं आहे. कोरोनाव्हायरस ज्या एन्झाइम्समार्फत मानवी शरीरातील पेशीत प्रवेश करतो, ते एन्झाइम्स महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचं दिसून आलं आहे आणि हेच त्यामागील कारण असावं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. Angiotensin-converting enzyme 2 (ACE2) हे फुफ्फुस, हृदय, किडनी आणि इतर अवयवांमध्ये सापडतं. मानवी शरीरातील पेशींमधील हेच एन्झाइम कोरोनाव्हायरसला पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करतं. नेदरलँडमधील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर ग्रोनिनजेनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसचा उद्रेक होण्यापूर्वी काही लोकांच्या शरीरातील ACE2 चा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यामध्ये कोरोना रुग्णांचा समावेश नाही. हे वाचा - सावधान! आता SEX ही सुरक्षित नाही?, शास्त्रज्ञांना स्पर्ममध्ये सापडला कोरोना 11 युरोपीयन देशातील 3,500 पेक्षा जास्त हार्ट फेलर रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील ACE2 ची पातळी तपासण्यात आली. तेव्हा महिलांपेक्षा पुरुषांच्या शरीरात ACE2 चं प्रमाण जास्त आहे, असं त्यांना दिसून आलं. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ACE inhibitors आणि angiotensin receptor blockers (ARBs) या औषधामुळे ACE2 चं प्रमाण वाढत नाही आणि त्यामुळेच हे औषध घेणाऱ्यांचा कोरोनाचा धोकाही वाढत नाही. ही दोन्ही औषधं हृदयाची समस्या असलेल्या, किडनीचा आजार असलेल्या किंवा मधुमेही रुग्णांना दिली जातात. संशोधनाचे अभ्यासक एड्रियान वुर्स आणि इझिहा समा म्हणाले, "फुफ्फुसांप्रमाणेच हृदय, किडनी आणि रक्तवाहिन्यांतील टिश्यूंमध्येही असे एन्झाइम्स आहेत. विशेषत: टेस्टिजमध्ये या एन्झाइम्सची पातळी जास्त दिसून आली आहे आणि त्यामुळेच पुरुषांमध्ये ACE2 चं प्रमाण जास्त आहे, परिणामी त्यांना कोरोनाव्हायरसचा धोकाही जास्त आहे" हे वाचा - ना औषध ना लस, 23 दिवसांच्या बाळानं फक्त आईच्या दूधानं कोरोनाला हरवलं संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या