सोल, 24 मार्च : कोरोनाव्हायरसने साऱ्या जगाला सध्या हतबल केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. आतापर्यंत या विषाणूने 16 हजार लोकांचा जीव घेतला आहे. एकीकडे या धोकादायक विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व देश मदत करत असताना, लोकांच्या दुर्लक्षामुळे हा विषाणू आणखी वेगाने पसरत आहे. दक्षिण कोरियामधील असे एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलीमुळे हजारो लोकांना कोरोनाचा फटका बसला.
कोरोना विषाणूची तपासणी करणार्या दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांना महिलेच्या दुर्लक्षामुळे हजारो लोकांना त्यांच्या देशात कोरोना विषाणूची लागण याचा शोध घेतला आहे. ही कोरोनाग्रस्त महिला दक्षिण कोरियामधील शेंचेनजी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेली होती. यानंतर, 6 फेब्रुवारीला किरकोळ अपघात झाल्यानंतर ही महिला रुग्णालयात पोहोचली. जेथे महिलेला तापही आला होता, मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले. यानंतर त्याच रुग्णालयात 119 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
वाचा-'एकदम खरं! कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक
दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये या महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेची ओळख उशीरा पटल्यामुळे ती सार्वजनिक स्थळांवर फिरत राहली. आता या महिलेमुळे 5 हजार लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला. इतकेच नाही तर, या एका महिलेमुळे बर्याच लोकांना प्राणही गमवावे लागले.
वाचा-Fact Check : तुमच्या टाळ्यांमुळे कोरोनाचा धोका झाला कमी?
या महिलेवर सरकारने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. म्हणूनच, लोकांना आयसोलेशनमध्ये राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी, लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
वाचा-कोरोनाचा महाभयंकर टप्पा, 4 दिवसात तब्बल 1 लाख लोकांना या व्हायरसची लागण
16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे. कोरोना विषाने आतापर्यंत जगभरातील 16 हजारहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर, 3.6 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे 6, हजार 077 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूची संख्या प्रत्येक देशात झपाट्याने वाढत आहे. जगातील 190 देशांना कोरोनाने वेढले आहे.