Home /News /national /

कोरोनाचा महाभयंकर टप्पा, 4 दिवसात तब्बल 1 लाख लोकांना या व्हायरसची लागण

कोरोनाचा महाभयंकर टप्पा, 4 दिवसात तब्बल 1 लाख लोकांना या व्हायरसची लागण

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे. जगभरात 3 लाख लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे.

    नवी दिल्ली, 24 मार्च : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे. जगभरात 3 लाख लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 16 हजारहून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत चिंता व्यक्त करताना, हा विषाणू थांबवण्यासाठी सर्व देशांनी आवश्यकत्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आवाहान सर्व देशांना केले. WHOचे कार्यकारी संचालक मायकल रेयन यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाचा कसा पसरला याची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी फारच धक्कादायक आहे. WHOने जाहीर केलेल्या आकडेवारीत पहिल्या कोरोना रुग्णानंतर 64 दिवसांनी 1 लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र केवळ 11 दिवसात दुसऱ्या टप्प्यात कोरोना पसरला. आता कोरोना इतका झपाट्याने वाढत आहे की, केवळ 4 दिवसांत 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही परिस्थिती धक्कादायक असून, यातून बाहेर पडण्यसाठी लवकरात लवकरत उपाय योजना करणे आवश्यक आहे. वाचा-महाभयंकर Coronavirus ची कमजोरी सापडली, अशी करता येऊ शकते मात जागतिक आरोग्य संघटेनेन केले भारताचे कौतुक भारताबाबत बोलायचे झाल्यास, देशातील 30 राज्य सध्या लॉक डाऊन करण्यात आली आहेत. तर, महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. भारत सध्या दुसऱ्या टप्प्यात असला तरी, भारतात वेगाने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपायांचे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी कौतुक केले. रेयान यांनी, भारत हा चीनसारख्या जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनचे काय झाले आपण सर्वांनी पाहिले. मात्र सार्वजनिक आरोग्य पातळीवर भारताने घेतलेली आक्रमक भुमिका योग्य आहे, असे सांगितले. तसेच, लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा भारत आता देत आहे, असेही रेयान म्हणाले. वाचा-पुण्याच्या कंपनीने अवघ्या 6 आठवड्यात बनवली 100 टक्के स्वदेशी COVID-19 टेस्ट किट 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे. कोरोना विषाने आतापर्यंत जगभरातील 16 हजारहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर, 3.6 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे 6, हजार 077 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूची संख्या प्रत्येक देशात झपाट्याने वाढत आहे. जगातील 190 देशांना कोरोनाने वेढले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या