मुंबई, 16 जानेवारी : इंटरनेटचा वापर विकृत लैंगिक हौस भागवण्याठी आणि इतरांना त्रास देण्यासाठी करणाऱ्या व्यक्ती जगभरात आहेत. या प्रकाराचे गुन्हे करणाऱ्या मंडळींना जरब बसावी अशी शिक्षा दक्षिण कोरियात (South Korea) एका आरोपीला सुनावण्यात आली आहे.
दक्षिण कोरियातील चो जू बिन (Cho Joo-bin ) या आरोपीला लैंगिक साहित्याची विक्री आणि वितरणासाठी (Sexual Material Produce And Distribution) 40 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण कोरियात डिजीटल अपराध रोखण्यासाठी गेल्या वर्षी (2020) नवा कायदा तयार करण्यात आला आहे. या देशातील कायद्यानुसार चाईल्ड पॉर्न (Child Porn) संबंधीच्या गुन्ह्यांमध्ये अडीच ते पाच वर्ष जेलची शिक्षा सुनावण्यात येते. मात्र चो चा गुन्हा विशेष श्रेणीतला असल्याचं सांगत त्याला जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय होता चो चा गुन्हा?
चो नं 2019 मध्ये एक टेलिग्राम ग्रुप (Telegram Group) तयार केला होता. त्यामध्ये चो नं चॅट रुमची (Chat Room) सोय उपलब्ध करुन दिली होती. या चॅटरुमच्या माध्यमातून हजारो डॉलर्स खर्च करुन तरुण मुलींवर अत्याचार केला जात असे. अगदी कमी कालावधीमध्ये हा ग्रुप दक्षिण कोरियाताल डिजीटल सेक्स अपराधामध्ये आघाडीचा ग्रुप बनला होता.
(हे वाचा- सख्ख्या मित्राने घेतला जीव; कारखान्यात तरुणाच्या Private Part मध्ये भरली हवा)
या विकृत व्हिडीओ प्लॅटफॉर्मचा प्रमुख म्हणून चो ला 40 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे पॉर्न व्हिडीओ (Porn Video), लैंगिक शोषण, बलात्कार, ब्लॅकमेलिंग, फसवेगिरी, लैंगिक अत्याचारासंबंधी रेकॉर्डिंग या सर्व गुन्ह्यांसाठी ही शिक्षा झाली आहे.
(हे वाचा- भयानक! पतीनं दारूच्या नशेत साथीदारांना सोबत घेत पत्नीबाबत केलं हे घृणास्पद कृत्य)
दक्षिण कोरियामध्ये ऑनलाईन सेक्स क्राईम संदर्भात नवा कायदा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकराच्या गुन्ह्यांना जास्तीत जास्त 2 वर्ष 6 महिने शिक्षेची तरतूद होती. आता नव्या नियमांनुसार जास्तीत जास्त पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अमेरिकेत ऑनलाईन सेक्स क्राईमसाठी कमीत कमी 15 वर्षांची शिक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, South korea