कटनी, 16 जानेवारी : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) कटनी जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या मित्रासोबत केलेली थट्टा त्याला महागात पडली आहे. या थट्टेमुळे त्या मित्राला तुरुंगात जावे लागले आणि दुसरीकडे त्याच्या मित्राला रुग्णालयात जावे लागले. (air filled in the Private Part ) पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील कटनीमध्ये माधव नगर पोलीस ठाणे हद्दीत एक डाळींचा कारखाना आहे. येथे सुखराम यादव आणि त्याचा मित्र विनोद ठाकूर काम करतात. कामादरम्यान विनोद ठाकूर यांनी सुखरामसोबत अत्यंत वाईट विनोद केला. ज्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. सांगितलं जात आहे की, कारखान्यात काम संपल्यानंतर मित्र कपडे बदलत होते.
हे ही वाचा-5 लिटर पेट्रोल घेऊन पोहोचला पत्नीच्या माहेरी; पहाटे भरझोपेत केलं धक्कादायक कृत्य
यादरम्यान विनोद ठाकूरने डाळ सुकविणाऱ्यासाठी वापरलं जाणारं कंप्रेशनचं नोजल सुखरामच्या प्रायव्हेट पार्टवर लावले आणि त्याच्या पोटात हवा भरू लागला. यामुळे सुखरामचं पेट अत्यंत वाईट प्रकारे फुगलं आणि त्याची प्रकृती बिघडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखरामला गंभीर अवस्थेत जवळील रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. (air filled in the Private Part ) पंजाब केसरीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा-'आता इच्छा नाहीये...' पंतप्रधानांनी सुरू केलेल्या लसीकरणाला महिला डॉक्टरचा नकार
माधव नगर ठाणे पोलिसांनुसार विनोद ठाकूर याने केलेली थट्टा त्याच्या मित्राला महागात पडली. दुर्देवाने यात त्याचा मृत्यू झाला. सुखरामच्या प्राटव्हेट पार्टमध्ये हवा भरल्यानंतर त्याच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली. आणि यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी तरुण विनोद ठाकूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर कटनीमध्ये सर्वजण हैराण झाले आहे. एखाद्याच्या जिवाशी कोण कसं थट्टा करू शकतं, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (air filled in the Private Part )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, PRIVATE part