मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भयानक! पतीनं दारूच्या नशेत साथीदारांना सोबत घेत पत्नीबाबत केलं हे घृणास्पद कृत्य

भयानक! पतीनं दारूच्या नशेत साथीदारांना सोबत घेत पत्नीबाबत केलं हे घृणास्पद कृत्य

विकृती आणि दारूची नशा माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. असाच एक घृणास्पद प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे.

विकृती आणि दारूची नशा माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. असाच एक घृणास्पद प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे.

विकृती आणि दारूची नशा माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. असाच एक घृणास्पद प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे.

जालौर, 16 जानेवारी : पती (husband) आणि पत्नीचं (wife) नातं हे जन्मोजन्मीचं पवित्र बंधन मानलं जातं. पुरातन काळापासून या नात्याचं रूप असंच राहिलेलं आहे. मात्र या रुपाला उद्ध्वस्त करणारी एक भयंकर बातमी समोर येते आहे.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातून (Rajasthan Jalore district) हा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. पतीनं आपल्या साथीदारांसह मिळून स्वतःच्या पत्नीवर चक्क सामूहिक बलात्कार (gang rape) केला आहे. जालौर कोतवाली ठाण्यात एका महिलेनं तिच्या विवाहित मुलीसोबत (married girl) दुष्कृत्य झाल्याचं सांगितलं. या महिलेनं मुलीचा पती आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दिली. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

पीडितेचा पती सिरोहीच्या मणादर गावात काम करायचा. पीडिता 3 मुलींची आई आहे. ती आपल्या माहेरी (maternal home) जालौर इथं राहत होती. 12 जानेवारीला पीडितेचा पती तिला दुचाकीवरून मणादर गावी घेऊन गेला. पीडितेचा आरोप आहे, की तिथं तिच्यासोबत धक्काबुक्की झाली. शिवाय तिचे पाय लोखंडाच्या दरवाजाला बांधले गेले. तिथं अर्जुन सिंग, छगना राम, नारायण हे साथीदार दारू (alcohol) पिऊन नशेत बसले होते. पतीनं बलात्कार केल्यावर या सगळ्यांनी लागोपाठ बलात्कार केला.

(हे वाचा- मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कापडी पिशवीतून 40 लाखांचे चरस विकणाऱ्याला अटक

दुसऱ्या दिवशी पीडितेचे आई-वडील पोचले, तर त्यांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर पीडितेला जालौरचे पोलीस अधीक्षक (SP) श्याम सिंह यांच्यासमोर नेलं गेलं. त्यांनी एकूणच प्रकरणाचं गांभीर्य ओळखत लगोलग कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पीडितेवर उपचार (treatment) सुरू आहे. कलम 161 नुसार पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.

First published:

Tags: Gang Rape, Rajasthan, Wife and husband