इस्लामाबाद, 21 एप्रिल : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी काही दिवसांपूर्वी देशातील एका बड्या समाजसेवकाची भेट घेतली होती. ही व्यक्ती मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज कोरोना चाचणी केली. दरम्यान चाचणी केल्यानंतर इम्रान यांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. अद्याप इम्रान यांच्या चाचणीचे रिपोर्ट आलेले नाही आहेत. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी इधी फाउंडेशनचे अध्यक्ष फैसल इधी यांची भेट घेतली. फैसल यांनी कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात पाकिस्तान सरकारला एक कोटी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यासाठी आले होते. पण त्यानंतर जेव्हा फैसल यांची चाचणी घेण्यात आली तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. इस्लामाबाद येथील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी इम्रान खानच्या कोरोना विषाणू चाचणी केली आहे. डॉक्टर फैसल सुलतान म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली असून त्याचे रिपोर्ट लवकरच जाहीर केले जातील. वाचा- पाकिस्तानचे PM करणार कोरोनाची चाचणी, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आले होते संपर्कात
وزیر اعظم عمران خان سے فیصل ایدھی کی ملاقات
— PTI (@PTIofficial) April 15, 2020
ایدھی فاونڈیشن کی طرف سے ایک کروڑ روپے کا چیک وزیراعظم کورونا ریلیف فنڈ کے لیے وزیر اعظم کو پیش کیا۔ pic.twitter.com/8FuqDOqmD5
वाचा- ‘मी कोरोनाशी लढतोय अन् माझी मुलं भुकेशी’, एका पित्याची थक्क करणारी कहाणी पंतप्रधान कार्यालयाकडून इम्रान खान आणि इधी यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. यामध्ये इम्रान यांनी मास्क किंवा ग्लोव्ह्जचा वापर केलेला दिसत नाही आहे. यामुळेच डॉक्टरांनी कोणताही धोका न घेता इम्रान खानची चाचणी करण्याचे ठरविले. या दोघांमधील बैठक सुमारे 7 मिनिटे चालली. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान इम्रान खान सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी काही दिवस कोणत्याही व्यक्तीची भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे. वाचा- ‘आम्हाला वाचवा नाहीतर…’, पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची एकूण संख्या 10 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. या आजारामुळे आतापर्यंत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंध आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात या विषाणूचा सर्वाधिक परिणाम होत आहे. फैसल इधी यांची प्रकृती स्थिर पंतप्रधानांना भेटल्यानंतर घरी परत आल्यावर फैसल यांना बरे वाटले नसल्याचे माध्यमात दिलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यांचा मुलगा साद इधी म्हणाले, इस्लामाबादमध्ये पंतप्रधानांना भेटल्यानंतर घरी परत आल्यावर काही लक्षणे दिसू लागली. मात्र पुढील तीन ते चार दिवसांनंतर ही लक्षणे कमी होऊ लागली. दरम्यान, कोरोना तपासणीसाठी एक नमुना पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आज (मंगळवार) आला आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. त्याचे वडील फैसल इधी यांची प्रकृती ठीक असल्याचे साद यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही. तर ते घरात क्वारंटाइनमध्ये आहेत. संपादन-प्रियांका गावडे