इस्लामाबाद, 21 एप्रिल : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी काही दिवसांपूर्वी देशातील एका बड्या समाजसेवकाची भेट घेतली होती. तो व्यक्ती मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आल्याची बाब समोर आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे आणि पंतप्रधानांना आवश्यक ती सर्व चाचण्या करण्यास सांगितले जात आहे. याबाबत इम्रान खान यांनी तयारी दाखविली आहे.
पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या पाकिस्तानातील समाजसेवी संस्था ईधी फाउंडेशनचे अध्यक्ष फैसल ईधी यांचा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आल्याचे समोर आले आहे. दिवंगत सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार ईधी यांचा मुलगा फैसल यांनी 15 एप्रिलला इस्लामाबाद येथील काही मोठ्या लोकांची भेट घेतली. यावेळी ते पंतप्रधान इम्रान खान यांना भेटले. आपल्या संस्थेच्या वतीने कोरोना रिलीफ फंडासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
पंतप्रधानांना भेटल्यानंतर घरी परत आल्यावर फैसल यांना बरे वाटले नसल्याचे माध्यमात दिलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यांचा मुलगा साद ईधी म्हणाले, इस्लामाबादमध्ये पंतप्रधानांना भेटल्यानंतर घरी परत आल्यावर काही लक्षणे दिसू लागली. मात्र पुढील तीन ते चार दिवसांनंतर ही लक्षणे कमी होऊ लागली. दरम्यान, कोरोना तपासणीसाठी एक नमुना पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आज (मंगळवार) आला आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. त्याचे वडील फैसल ईधी यांची प्रकृती ठीक असल्याचे साद यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही. तर ते घरात क्वारंटाइनमध्ये आहेत.
संबंधित -मुंबईत पुन्हा मोठी वाढ, 24 तासांत 419 नवे कोरोनाचे रुग्ण; राज्याचा आकडा 5000 पार
रॅपिड टेस्टिंगवर 2 दिवस बंदी; निकालातील गोंधळामुळे ICMR कडे तक्रार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.