इस्लामाबाद, 21 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. पाकिस्तानमध्येही परिस्थिती बिकट होत चालली आहे. पाकमध्ये आतापर्यंत 8 हजार 418 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 176 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा जास्त लोकांना पाकिस्तानमध्ये उपासमारीची चिंता आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच उपासमारीला कंटाळून लाहोरमध्ये कोरोना विषाणूच्या रूग्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील मेयो रुग्णालयाचे प्रमुख डॉ. असद असलम यांनी घटनेची माहिती दिली. डॉक्टरानी सांगितले की, 'पीडित आमिर (नाव बदलले आहे) घरात समस्या असल्यामुळे नैराश्यात होता आणि म्हणूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला'.
'हमारी वेब डॉट कॉम'च्या वृत्तानुसार पीडित तरुणाने या प्रकरणात म्हटले आहे की, 'मी येथे रुग्णालयात कोरोनाविरूद्ध लढत आहे आणि माझी मुले गावात उपासमारीने मरत आहे. या संकटाला कंटाळून मी आत्महत्येचा प्रयत्न केला'. सरगोडाच्या नवही खेड्यातील रहिवासी असलेल्या कोरोनाने संक्रमित आमिरवर लाहोरच्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाचा-पालघर प्रकरणावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, उज्ज्वल निकम म्हणाले...
'हे चुकीचे आहे, परंतु संकटात मला काहीही समजले नाही'
त्याचवेळी आमिरने सांगितले की, त्यांना 29 मार्चला रुग्णालयात आणले गेले आणि गेल्या 20 दिवसांपासून त्याच्यावर लाहोरच्या मेयो हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डात उपचार सुरू आहेत. तो म्हणतो, "मला माहित आहे की ही चुकीचे पाऊल आहे. परंतु मला अडचणीत काहीही समजले नाही." त्यांच्या म्हणण्यानुसार त्याने कोरोना वॉर्डमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्याला वाचवले.
वाचा-3 मेनंतर असा असेल लॉकडाऊनचा एक्झिट प्लान, मोदी सरकारची Exclusive स्टोरी
इमरान खान यांनी मागितली होती मदत
ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये इमरान यांनी जगातील वित्तीय संस्थांना पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी मोहीम राबवावी असे आवाहन केले. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ केले जावे, अशी मागणी इमरान यांनी केली. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानसारखा कर्जबाजारी देश कोरोनाची सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जगातील बड्या संस्थांनी अशा देशांना मदत करण्यासाठी एक मोहीम सुरू करावी, अशी मागणीही यावेळी केली.
वाचा-Corona पासून बचावासाठी मास्क वापरण्याचा आग्रह, काळजी घ्या नाहीतर होईल उलट परिणाम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona