6 फुटापर्यंतचे सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही! तज्ज्ञांच्या अभ्यासातून आली महत्त्वपूर्ण माहिती

सोशल डिस्टन्सिंगसाठी 6 फुटाचं अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र विविध संशोधनातून कोरोनाबाबतच्या माहितीत बदल होताना दिसत आहे.

सोशल डिस्टन्सिंगसाठी 6 फुटाचं अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र विविध संशोधनातून कोरोनाबाबतच्या माहितीत बदल होताना दिसत आहे.

  • Share this:
    लॉस एंजलिस, 27 मे : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. काही देशांना कोरोनाला नियंत्रण आणण्यात यश आलं आहे. मात्र इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी 6 फूटाचं अंतर ठेवणं पूरेसं नाही, कारण हा जीवघेणा कोरोना व्हायरस शिंकल्या वा खोकल्यानंतर तब्बल 20 फूट अंतरावर जाऊ शकतो. वैज्ञानिकांनी विविध वातावरणातील स्थितीत खोकणे, शिंकणे आणि श्वास सोडताना नाकातून येणाऱ्या संक्रमणाच्या थेंबांच्या प्रसाराचा मॉडेल तयार केला आहे. त्यानुसार कोरोना व्हायरस सर्दी आणि थंड वातावरणात तीन पटीने पसरू शकतो. या संशोधनात अमेरिकेतील सांता बारबरास्थित कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांचाही समावेश आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार शिंकणे आणि खोकल्यादरम्यान तोंड आणि नाकावाटे निघाणारे थेंब विषाणू 20 फुटाच्या अंतरापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे संक्रमणाला रोखण्यासाठी 6 फूटाचे सोशल डिस्टन्सिंग नियम पुरेसा नाही. त्यातही सर्दी असणाऱ्यांना आणि थंडीच्या वातावरणात हा धोका अधिक वाढतो. दरम्यान कोरोनाल रोखण्यासाठी देशांमध्ये विविध प्रयोग केले जात आहे. कोरोना संक्रमणाविरूद्धच्या युद्धात देशाने आपली चाचणी क्षमता लक्षणीयरीत्या वाढविली आहे. आता सीएसआयआर लवकरच एक नवीन चाचणी आणणार आहे. ज्यामध्ये 50 हजार नमुन्यांची चाचणी एकाचवेळी घेणे शक्य होणार आहे. सीएसआयआरच्या हैदराबादस्थित प्रयोगशाळेतील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) यांनी नवीन पिढीच्या अनुक्रम चाचणीची तयारी केली आहे. हे वाचा -हुश्श! अखेर धारावीतून आली चांगली बातमी; कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट कोरोनाच्या संकटात या राज्याचं मोठं पाऊल; 47000 कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार  
    First published: