हुश्श! अखेर धारावीतून आली चांगली बातमी; कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पहिल्यांदाच दिसली घट

हुश्श! अखेर धारावीतून आली चांगली बातमी; कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पहिल्यांदाच दिसली घट

मुंबई, पुण्यातील वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यातच धारावीतून सकारात्मक बातमी समोर आली आहे

  • Share this:

मुंबई, 27 मे : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबई, पुणे या भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणणं आवश्यक आहे. त्यातच आज धारावीतून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोना शिरल्याने झपाट्याने रुग्णसंख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली जात होती. गेल्या तीन दिवसात धारावीतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत धारावीत कोरोनाची रुग्णसंख्या 1639 पर्यंत पोहोचली आहे. धारावीमध्ये मागच्या 24 तासांत 18 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसात धारावीतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे.

तारीख - रुग्णसंख्येतील वाढ

27 मे - 18

26मे - 38

25 मे - 42

24 मे - 27

धारावीसह जी उत्तर मधील रुग्णसंख्या वाढत असल्याने आकडेवारीत थोड्या प्रमाणात घट जाणवत आहे. मागच्या 3 दिवसात दादर माहीम, धारावी मध्ये एकूण 128 रुग्णांची वाढ झाली आहे, जी गेल्या आठवड्यापेक्षा कमी आहे.

जी उत्तर

तारीख - एकूण रुग्णसंख्या

27 मे -  2300

26मे -  2241

25 मे -  2173

पुणे जिल्हा

6604 एकूण बाधित रुग्ण

3355 रुग्ण बरे झाले

2954 active रुग्ण

295 एकूण मृत्यू

193 गंभीर रुग्ण

दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण अजूनही साथ आटोक्यात आलेली नाही. उलट वाढतेच आहे. आता चौथा लॉकडाऊन संपायच्या आतच लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू आहे.

हे वाचा -कोरोनाच्या संकटात या राज्याचं मोठं पाऊल; 47000 कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार

'महाराष्ट्राला पक्के माहीत आहे..शत्रू कोण अन् मित्र कोण', फडणवीसांचा पलटवार

First published: May 27, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading