मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनाच्या संकटात या राज्याचं मोठं पाऊल; 47000 कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार

कोरोनाच्या संकटात या राज्याचं मोठं पाऊल; 47000 कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या संकटामुळे विविध राज्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. त्यात ही सकारात्मक बातमी समोर आली आहे

नवी दिल्ली, 27 मे : कोरोनाच्या संकटामुळे विविध राज्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. त्यातही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो प्रवासी मजूर आपल्या घरी परतले आहेत.

अशातच तामिळनाडूतून एका चांगली बातमी समोर आली आहे. तामिळनाडू सरकारने बुधवारी सांगितले की त्यांनी 17 कंपन्यांसह 15100 कोटीव रुपयांहून अधिकचे नवे करार केले आहे. ज्यामुळे राज्यात तब्बल 47150 लोकांना रोजगार मिळेल.

10000 लोकांना रोजगार

सरकारने सांगितले की हे करार वाणिज्यिक वाहन आणि ऊर्जासह विविध क्षेत्रांसाठी करण्यात आले आहे आणि यातील 9 करार सचिवालयमधील मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या उपस्थितीत झाले. 8 कंपन्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून करार केले. सरकारने एका अधिकृत जाहिरातीत सांगितले की फिनलँडस्थित सायकॉम्प विस्तार परियोजनेसाठी 1300 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे 10000 लोकांना रोजगार मिळेल.

दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. पण अजूनही साथ आटोक्यात आलेली नाही. उलट वाढतेच आहे. आता चौथा लॉकडाऊन संपायच्या आतच लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू आहे. पण हा पाचवा लॉकडॉऊन स्वयंस्फूर्तीने असेल. याचे निर्बंध आणि नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यतः कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या 11 शहरांपुरता तो मर्यादित असू शकतो.

हे वाचा - 4 वर्षांच्या चिमुरडीने केलं असं काही की SP नीही केलं कौतुक, VIDEO झाला व्हायरल

सरकारी रुग्णालयाचे वाभाडे काढणाऱ्या भाजपच्या VIDEO वर मुख्यमंत्र्यांचं उत्तर

First published: