Home /News /videsh /

No Mosque Country: काय सांगता! या देशात नाही एकही मशीद, नवी बांधायला परवानगीही नाही

No Mosque Country: काय सांगता! या देशात नाही एकही मशीद, नवी बांधायला परवानगीही नाही

No Mosque Country: जगभरातल्या देशांमध्ये विविध धार्मिक स्थळांना खूप महत्त्व आहे. मात्र एक देश असा आहे जिथं या गोष्टी दिसत नाहीत.

    ब्रातीसलावा, 24 फेब्रुवारी : जगात एक असा देश आहे जिथं बहुसंख्य मुस्लिम राहतात मात्र तिथं एकही मशीद (mosque) नाही. असा देश या जगात अपवादात्मक पद्धतीनं आजही अस्तित्वात आहे. या आश्चर्यकारक देशाचं नाव आहे स्लोवाकिया (Slovakia). 2010 साले इथं मुस्लिमांची लोकसंख्या (population)होती जवळपास 5000. मुस्लिम देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 0.1 टक्के होते. या देशात जे मुस्लिम 17 व्या शतकाच्या आसपास आले ते तुर्क आणि उईगर होते. ते स्लोवाकियाच्या मध्य आणि दक्षिण भागात वसले. या देशाचं नाव पूर्वी युगोस्लाविया (Yugoslavia) होतं. नंतर विभाजन होऊन या देशाचं नाव झालं स्लोवाकिया. युगोस्लाविया विभाजित झाल्यानं बोस्निया (Bosnia) आणि अल्बानिया हे देशसुद्धा बनले. सगळे मुस्लिम शरणार्थी बनून इथं पोचले. इथली राजधानी आहे ब्रातीसीओवा. स्लोवाकिया युरोपीय युनियनचा (European Union) सदस्य आहे मात्र तो एक असा देश आहे जो सर्वात शेवटी युनियनचा सदस्य झाला. इथं एकही मस्जिद नाही. याबद्दल अनेकदा वादही झाले. हेही वाचा- मुस्लीम मामा, हिंदू भाची! या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन 2000 साली स्लोवाकियाच्या राजधानीत इस्लामिक सेंटर (Islamic center) बनवण्यावरूनही बरेच विवाद झाले. ब्रातीसीओवाच्या मेअरनं स्लोवाक इस्लामिक वक्फ फाउंडेशनच्या  सगळ्या प्रस्तावांना फेटाळून लावलं. 2015 साली युरोपसमोर शरणार्थी हा एक मोठा मुद्दा बनला होता. स्लोवाकियानं तेव्हा 200 शरणार्थींना शरण दिली होती. मात्र मुस्लिमांना शरण देण्यास या देशानं नकार दिला. याचं कारण देताना स्लोवाकियाच्या विदेश मंत्रालयानं (foreign ministry) म्हटलं, की त्यांच्याकडं मुस्लिमांच्या प्रार्थनेसाठी एकही जागा नाही. अशावेळी मुस्लिमांना शरण दिल्यानं अनेक प्रश्न उभे राहू शकतात. या निर्णयावर युरोपियन युनियननं टीकाही केली. यासोबतच 30 नोव्हेंबर 2016 रोजी स्लोवाकियानं एक कायदा बनवत इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देण्यावर निर्बंध लावले. याचा अर्थ स्लोवाकियामध्ये इस्लामला एक धर्म (Islam religion) म्हणून स्वीकारलं जाणार नाही. स्लोवाकिया युरोपीय युनियनमधील असा एकच देश आहे जिथं एकही मशीद नाही. हेही वाचा- हिंदू-मुस्लीम ऐक्याची प्रचिती!राम मंदिरासाठी मुस्लीम उद्योजकाने दिले 1 लाख रुपये ब्रातीसिओवा या राजधानीबाहेर केवळ एक इस्लामिक सेंटर आहे जिथं मुस्लिम नमाज पढायला जातात. ही एकाच जागा देशभरात आहे जिथं मुस्लिम नमाज अदा करू शकतात. इथं केवळ 80 ते 100 लोक एकावेळी जाऊ शकतात इतकी ही लहान जागा आहे. या भवनात मस्जिदीत होणाऱ्या पारंपरिक सजावटीचीही परवानगी नाही. स्लोव्हाकियामध्ये मुस्लिमांनी अनेकदा प्रयत्न केले की या सेंटरला अधिकृत मशीदचा दर्जा मिळावा. मात्र प्रत्येक सरकार या विनंतीला फेटाळून लावते. स्लोव्हाकियामध्ये काही नियम आणि कायदे यांचं नेहमीच पालन केलं जातं. इथं प्रत्येकाला आपलं ओळखपत्र सोबत ठेवावंच लागतं. तुम्ही स्लोव्हाकियामध्ये फिरायला गेलात तर तुम्हाला पासपोर्ट सोबत ठेवावा लागतो. स्लोव्हाकियामध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक कायदा बनलेला आहे. तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत कुणासोबत अयोग्य वागू शकत नाही, गोंधळ घालू शकत नाही. नाहीतर पोलीस तुम्हाला पकडू शकतात. असं केल्यास मोठा दंडही भरावा लागू शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Muslim, Religion, Slovakia

    पुढील बातम्या