कोरोनाच्या आणखी एका लक्षणाचा लागला शोध, तुम्हीही घ्या काळजी!

कोरोनाच्या आणखी एका लक्षणाचा लागला शोध, तुम्हीही घ्या काळजी!

स्थानिक वातावरण, लोकांची जिवनशैली आणि इतर परिस्थितीमुळे काही वेगळी लक्षणे दिसत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

  • Share this:

लंडन 15 जुलै: कोरोनावर सगळ्या देशांमधले तज्ज्ञ औषध शोधत आहेत. मात्र अजुनही रामबाण औषध सापडलेलं नाही. मात्र जगभरातले तज्ज्ञ कोरोना रुग्णांचा (Cororna Patient) अभ्यास करत असून त्यातून महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. सर्दी, ताप, खोकला, कफ, घश्यात खवखवणे अशी लक्षणे आत्तापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये दिसत होती. नंतर त्यात आणखी काही लक्षणांची भर पडली आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये नवं लक्षणं आढळून आलं आहे. कोरोना रुग्णांच्या त्वचेवर रॅशेश (Skin Rashes) येत असल्याचं आढळून आलं आहे.

प्रत्येक 11 कोरोना रुग्णांमागे एका रूग्णाला त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळून आलं आहे. कोरोना गेल्यानंतरही काही दिवस ही समस्या निर्माण होऊ शकते असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

किग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या डॉक्टरांनी 20 हजार रुग्णांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. ब्रिटनमधल्या 9 टक्के लोकांच्या त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळून आलंय. तर 8 टक्के लोकांना इतर लक्षणांसोबतच त्वचेवर रॅशेश असल्याचं दिसून आलं.

गंध न येणं, अशक्तपणा, भूक न लागणे, डायरिया अशीही लक्षणं भारतात आढळून आली आहेत. त्यात आता हे नवं लक्षण आढळून आल्याने सगळ्यांनाच काळजी घेण्याची गरज आहे.

जे इतरांना जमलं नाही ते 90 वर्षांच्या आजींनी करून दाखवलं, 12 दिवसांत कोरोनामुक्त

अनेक देशांमध्ये काही लक्षणे वेगवेगळी आढळून आली आहेत. स्थानिक वातावरण, लोकांची जिवनशैली आणि इतर परिस्थितीमुळे काही वेगळी लक्षणे दिसत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ब्रिटनमधल्या काह तज्ज्ञ डॉक्टरांनी अभ्यासानंतर याविषयीचा अहकाशवाल प्रकाशित केला आहे.

कोरोनावर प्रभावी 'या' औषधाच्या 60 हजार बॉटल्स भारतात येणार, महाराष्ट्राला फायदा

याा लक्षणांमुळेच लोकांना आपल्याला व्हायरसची बाधा झाली का? याची माहिती होते. यातली काहीही लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आता कोरोना टेस्टिंग सेंटरची संख्या वाढल्याने नागरिकांनाही पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 15, 2020, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading