Home /News /videsh /

VIDEO: चमच्यानं बोगदा खोदून 6 कैदी तुरुंगातून फरार; दहशतवादी हल्ल्याप्रकरणी होते अटकेत

VIDEO: चमच्यानं बोगदा खोदून 6 कैदी तुरुंगातून फरार; दहशतवादी हल्ल्याप्रकरणी होते अटकेत

बोगदा खोदून अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहातून सहा गंभीर गुन्ह्यातील कैदी पळून गेले आहेत (Six Prisoners Escaped Jail Through Tunnel).

    नवी दिल्ली 07 सप्टेंबर : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट जेल ब्रेकवर (Jail Break) बनले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये तुरुंगात असलेला नायक बाहेर पडण्याची योजना बनवतो आणि कडक सुरक्षा असूनही तो त्याच्या मिशनमध्ये यशस्वी होतो. इस्रायलमध्येही अशीच एक घटना घडली. यात बोगदा खोदून अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहातून सहा गंभीर गुन्ह्यातील कैदी पळून गेले आहेत (Six Prisoners Escaped Jail Through Tunnel). आता जेल ब्रेकमुळे इस्रायली अधिकाऱ्यांवर टीका केली जात आहे. ही घटना उत्तर इस्राईलमधील गिलबोआ तुरुंगातील आहे. पोलिसांनी सांगितले की कारागृहातून पळून गेलेले सर्व सहा कैदी एकाच कोठडीत कैद होते. यापैकी पाच इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित आहेत आणि एक त्याच्याशी संलग्न असलेल्या सशस्त्र गटाचा माजी कमांडर आहे. उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगातून सुटण्यासाठी कैद्यांनी बाथरूममध्ये सिंकखाली एक बोगदा खोदला. गंजलेल्या चमच्यांच्या मदतीने ते अनेक दिवस बोगदा खोदत राहिले. हे कैदी एक एक करून येत आणि बोगदा खोदत असत, यानंतर सामान्य कैद्यांसारखे वागत असत. कैदी अत्यंत हुशारीनं आणि शांततेत हे काम केलं की कोणाला कानोकान तपासही लागला नाही. माझा, माझा करत एकासाठी भिडल्या दोघी! नवरीसाठी झाला टॉस, नवरदेवाने निवडली नवरी कैद्यांनी बाथरूममधून तुरुंगाच्या बाहेर एक बोगदा खोदला आणि सोमवारी तिथून पळ काढला. पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, कैद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. ते आता जवळच्याच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक प्रदेशात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि मोठ्या संख्येने पोलीस दल त्यांचा शोध घेत आहेत. याशिवाय 400 कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. चीन आणि पाकला भरणार धडकी! भारताच्या संरक्षणासाठी 'ध्रुव' असणार सज्ज इस्लामिक जिहादने (Islamic Jihad) जेल ब्रेकबाबत आनंद व्यक्त करत, पळून गेलेल्या कैद्यांना नायक म्हटलं आहे. त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाईचे वाटपही केले आहे. हमासचा प्रवक्ता फावदी बारहौम म्हणाला की, हा एक मोठा विजय आहे, हे इस्त्रायली तुरुंगात असलेल्या आमच्या शूर सैनिकांची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचा पुरावा देणारी घटना आहे. इस्रायली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कैद्यांपैकी एक झकारिया जुबैदी होता, जो पश्चिम किनारपट्टीच्या जेनिन शहरातील अल-अक्सा शहीद ब्रिगेडचा माजी कमांडर होता. ही तीच ब्रिगेड आहे ज्याने 2000 ते 2005 दरम्यान इस्रायली लोकांवर प्राणघातक हल्ले केले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Prisoners, Viral news

    पुढील बातम्या