Home /News /lifestyle /

काय म्हणावं याला! PUBG साठी 12 वर्षांच्या मुलाचा नको तो प्रताप; पोलिसांनाही फुटला घाम

काय म्हणावं याला! PUBG साठी 12 वर्षांच्या मुलाचा नको तो प्रताप; पोलिसांनाही फुटला घाम

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

मित्रासोबत पब्जी खेळण्यासाठी 12 वर्षांच्या मुलाने जे केलं त्यामुळे पोलीसही हैराण झाले.

    बंगळुरू, 05 एप्रिल : हल्ली लहान मुलांमध्येही मोबाईल वापराचं प्रमाण वाढलं आहे. पब्जीने तर सर्वांनाच वेड लावलं आहे. पब्जीच्या नादात मुलं काय काय करतात याबाबत बरीच प्रकरणं समोर आली आहेत. आता तर एका मुलाने पब्जीच्या वेडापायी असं काही केलं आहे की पोलिसांनाही घाम फुटला. पब्जी खेळण्यासाठी 12 वर्षांच्या मुलाने नको तो प्रताप केला आहे. मित्रासोबत पब्जी खेळण्यासाठी 12 वर्षांच्या मुलाने चक्क फेक फोन कॉल करून ट्रेन थांबवली. यामुळे पोलीसही हैराण झाले (Boy stop train for pubg playmate). कर्नाटकातील बंगळुरूच्या यलहंका रेल्वे स्टेशनवर 30 मार्चला दुपारी 2 वाजता हेल्पलाइन नंबर 139 वर एक पोन आला. ज्यात रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याचं सांगण्यात आलं. फोन कॉलनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्यात. संपूर्ण रेल्वे स्टेशन रिकाम करण्यात आलं. पोलिसांनी सगळीकडे शोधलं. पण त्यांना कुठेच काही सापडलं नाही. तब्बल 90 मिनिटं वाया गेली. हे वाचा - कधीच पाहिलं नसेल असं नवरा-बायकोचं भांडण सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO च्या शेवटी आहे मोठा ट्विस्ट मग पोलिसांनी हा फोन कुठून आला होता याची माहिती मिळवली. तो फोन विनायक नगरमधील एका किराणा दुकानातून केला गेला होता. या दुकानदाराने आपल्या 12 वर्षांच्या मुलाला फोन दिला होता आणि त्यानेच हा फोन केला होता. पोलिसांनी मुलाला असा फोन करण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलीस शॉक झाले. तो आपल्या मित्रासोबत पब्जी गेम खेळत होता. त्याचा पब्जी प्लेअर मित्र कुटुंबासोबत यलहंका रेल्वे स्टेशनवर काचेगुडा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये होता.  ट्रेन चालू झाली तर त्याला नेटवर्क मिळणार नव्हतं. पण त्याला आणखी खेळायचं होतं. म्हणून त्याने फोन कॉल करून ट्रेन थांबल्याचं सांगितलं. हे वाचा -कुणालाच जमलं नाही याचं उत्तर; तुम्ही सांगू शकता हा या Photo मध्ये किती आहेत 3 Number मुलगा लहान होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही पण त्याला वॉर्निग देऊन सोडून दिलं. तर  बॉम्ब शोधकपथकाने 4.45 वाजता क्लिअरंस सर्टिफिकेट दिलं तेव्हा ट्रेन सुरू झाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: PUBG, Pubg game

    पुढील बातम्या