मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तेल टँकरची दुसऱ्या गाडीला धडक, धडकेत भीषण स्फोट; 91 हून अधिक लोकांचा मृत्यू

तेल टँकरची दुसऱ्या गाडीला धडक, धडकेत भीषण स्फोट; 91 हून अधिक लोकांचा मृत्यू

PRESIDENT JULIUS MAADA BIO/ TWITTER

PRESIDENT JULIUS MAADA BIO/ TWITTER

तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत जवळपास 91 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम आफ्रिका, 06 नोव्हेंबर: Sierra Leone Fuel Depot Blast: आफ्रिकन देश सिएरा लिओनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत जवळपास 91 लोकांचा मृत्यू झाला आहे (Blast in Africa).तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. देशाची राजधानी फ्रीटाऊनमध्ये (Freetown) ही घटना घडली आहे.

कशी घडली दुर्घटना

40 फूट उंच तेलाच्या टँकरनं दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं ही घटना घडली. यानंतर हा मोठा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिक माध्यमांनी या घटनेचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये टँकरभोवती लोकांचे मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.

हेही वाचा- Watch Video: 2500 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे सापडले अवशेष 

महापौर यवोन अकी-सॉयर (Yvonne Aki-Sawyerr) यांनी व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर या घटनेचे वर्णन 'भयानक' असं केलं आहे. किती नुकसान झालं हे सांगणं कठीण असल्याचंही ते म्हणाले. फेसबुक पोस्टमध्ये, महापौर म्हणाले की, 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची अफवा आहे. मात्र अद्याप अधिकृत मृतांचा आकडा समोर आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे.

सुपरमार्केट बाहेर झाला अपघात

वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सरकारी माध्यमांनी मृतांची संख्या 91 अशी सांगितली आहे. पण नेमका आकडा अद्याप कोणालाच माहीत नाही (Blast in Sierra Leone). शहरातील वेलिंग्टन परिसरातील एका सुपरमार्केटच्या बाहेर हा स्फोट झाल्याचं समजतंय. सिएरा लिओनच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख ब्रिमा ब्यूरेह सेसे यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, हा एक भयंकर अपघात आहे. या किनारी शहरामध्ये दहा लाखांहून अधिक लोक राहतात. ज्यांनी अलिकडच्या वर्षांत अनेक गंभीर संकटांचा सामना केला आहे.

अमेरिकेत म्यूझिक फेस्टिव्हलदरम्यान चेंगराचेंगरीमुळे 8 जण ठार

अमेरिकेतील दक्षिणेकडील ह्यूस्टन राज्यातील अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ह्यूस्टन अग्निशमन विभागाचे प्रमुख सॅम्युअल पे यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, या घटनेचे कारण अद्याप समजलेले नाही.

हेही वाचा- उद्याचा मेगाब्लॉक जाहीर, या मार्गावरील रेल्वे सेवा बंद; असं असेल वेळापत्रक

पेन्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आजच्या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू आणि डझनभर लोक जखमी झाल्याची पक्की माहिती आमच्याकडे आहे.' त्यांनी अशी माहिती दिली की, त्यांना प्राथमिक चौकशीत अशी माहिती मिळाली आहे की याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी स्टेजच्या दिशेने सरकत होती आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली. याठिकाणी चेंगराचेंगरीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जणांना रुग्णालयात भरती करण्याच आले आहेत. यापैकी 11 जणांन हृदयविकाराचा झटका आल्याचीही माहिती मिळते आहे.

First published:

Tags: Africa