मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

उद्याचा मेगाब्लॉक जाहीर, या मार्गावरील सेवा राहतील बंद; वाचा संपूर्ण वेळापत्रक

उद्याचा मेगाब्लॉक जाहीर, या मार्गावरील सेवा राहतील बंद; वाचा संपूर्ण वेळापत्रक

उद्या मध्य रेल्वेनं (Central Railway) तांत्रिक कारणांमुळे मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला आहे.

उद्या मध्य रेल्वेनं (Central Railway) तांत्रिक कारणांमुळे मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला आहे.

उद्या मध्य रेल्वेनं (Central Railway) तांत्रिक कारणांमुळे मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 06 नोव्हेंबर: उद्या 7 नोव्हेंबर (November 7) म्हणजे रविवारी (Sunday). उद्या मध्य रेल्वेनं (Central Railway) तांत्रिक कारणांमुळे मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला आहे. रविवारी 7 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागातील हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

उद्या मध्य रेल्वे देखभालीचं काम करण्यासाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येईल.

कसा असेल उद्याचा मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4..40 पर्यंत

चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 पर्यंत.

या सेवा बंद असतील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद असणार

हेही वाचा- कोण आहेत NCB अधिकारी संजय सिंह? आर्यन खान केससह ज्यांच्याकडे  6 प्रकरणाचा तपास 

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा

गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद असणार.

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत आणि ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करिता सुटणाऱ्या

पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी 10.15 ते सायंकाळी 04.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.

हेही वाचा- केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्याचा अपघात, तीन गाड्यांची एकमेकांना धडक; 2 जखमी

मेगाब्लॉकच्या वेळेत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

First published:

Tags: Mumbai local