युरोप, 06 नोव्हेंबर: मुद्रात ( sea ) शेकडो वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या जहाजाचे ( ship ) अवशेष जेव्हा सापडतात, तेव्हा हे जहाज नेमकं कुठे चाललं होतं, त्यामध्ये काही मौल्यवान वस्तू, सोने ( gold ) होतं का, किती वर्षांपूर्वी या जहाजाला जलसमाधी मिळाली आहे, अशा चर्चा सुरू होतात. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या काही गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जातो. एजियन समुद्रात ( Aegean Sea ) हजारो वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या जहाजाचे अवशेष सापडल्यामुळे अशीच चर्चा सुरू झाली आहे. नवभारत टाइम्स ने याबाबत वृत्त दिलं आहे.
किथिरा ( Kithira ) या ग्रीक बेटाजवळील एजियन समुद्रात एका प्राचीन जहाजाचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष इसवी सन पूर्व चौथ्या ते पाचव्या शतकाच्या मध्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ग्रीक पॉवर ट्रान्समिशन कंपनी इंडिपेंडंट पॉवर ट्रान्समिशन ऑपरेटर एसएने सागरी सर्वेक्षणादरम्यान हे अवशेष शोधून काढले. पाण्याखालील सर्वात मोठी पॉवर केबल टाकण्याच्या कामासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
हेही वाचा- केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्याचा अपघात, ताफ्यातल्या तीन गाड्या धडकल्या, 2 पोलीस कर्मचारी जखमी
बुडालेले जहाज, त्याचा आकार आणि वजन याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी संशोधक जहाजाचे 3 डी फोटो तयार करण्याचे काम करत आहेत. यापूर्वी सप्टेंबरमध्ये संशोधकांनी मॅक्स रोव्हर नावाच्या रिमोट कंट्रोल वाहनाच्या मदतीने हे सर्वेक्षण केले होते. संशोधकांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये बुडालेल्या जहाजामध्ये असलेल्या भांड्यांचे अवशेष समुद्रातून बाहेर काढताना दिसत आहेत.
दरम्यान, जलसमाधी मिळालेली जहाजं शोधणं हे पाण्याखालील सर्वेक्षण करताना सागरी संशोधकांसाठी काही नवीन नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला युरोपियन देश लॅटव्हियामध्ये समुद्र किनाऱ्यावर एका जहाजाचे रहस्यमय अवशेष सापडले होते. देशाची राजधानी रीगा जवळील दौगवग्रीव (Daugavgrīva ) नावाच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक लोकांनी याचा शोध लावला. पाण्याच्या पृष्ठभागावर अवशेष तरंगत असल्याचे पाहून लोक तेथे जमा झाले होते, तेथे जहाजाचे अवशेष सापडले.
हेही वाचा- 1800 लिटर तेल आणि 51 हजार दिवे..! अयोध्येप्रमाणेच श्रीरामांच्या आजोळीही दिवाळीचा थाटमाट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news