वॉशिंग्टन : काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण 2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत अशी घोषणा केली आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी एक सर्वेक्षण केले. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ट्विटरवर अकाऊंट ओपन करण्याची परवानगी देण्यात यावी की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एलोन मस्क यांनी एक ट्विट करत आपल्या 11.6 कोटी फॉलोअर्सला हा प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी आणखी एक लॅटीन भाषेत ट्विट केलं. ज्याचा अर्थ लोकांचा आवाज हाच इश्वराचा आवाज असा होतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत ट्विटवर प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या एका फॉलोअर्सने त्यांना असे सुचवले की, हा प्रश्न केवळ तुमच्या फॉलोअर्सला नाही तर संपूर्ण ट्विटर वापरकर्त्यांना विचारण्यात यावा. मस्क यांनी आपल्या या फॉलोअर्सचे स्वागत करत त्याने केलेल्या सूचनेला सहमती दर्शवली. 2021 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने अस्थाई काळासाठी बॅन केले होते. प्रशोभक भाषणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सातत्याने चर्चेत ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्क यांनी घेतलेल्या काही निर्णयावर जगभरातून टीका झाली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली कर्मचाऱ्यांची कपात. तसेच पेड ब्लू टीक बाबतच्या निर्णयाचा समावेश आहे. ट्विटर विकत घेतल्यापासून एलोन मस्क याना त्या कारणाने सातत्याने चर्चेत आहेत. ते आता पुन्हा या सर्वेक्षणामुळे चर्चेत आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.