Home /News /videsh /

BREAKING: मेक्सिकोत शूटआऊट, अंदाधुंद गोळीबारात 19 जणांचा मृत्यू

BREAKING: मेक्सिकोत शूटआऊट, अंदाधुंद गोळीबारात 19 जणांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

shootout in mexico 19 people killed: मेक्सिकोमध्ये मोठं शूटआऊट झालं आहे. या वेळी झालेल्या गोळीबारात तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

    मेक्सिको, 18 मार्च : मेक्सिकोमध्ये मोठं शूटआऊट (shootout in Mexico) झालं आहे. या गोळीबारात तब्बल 19 जणांचा मृत्यू (19 people died in firing) झाला आहे. सेंट्रल मेक्सिकोमध्ये ही घटना घडली आहे. सेंट्रल मेक्सिको प्रशासनाच्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडे 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि संपूर्ण परिसराला घेरलं. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 16 पुरुष आहेत तर 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतरही काहीजण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची ही घटना सेंट्रल मेक्सिकोतील मिचोआकन राज्यातील लास तिनाजस परिसरात घडली आहे. या ठिकाणी नागरिक एका समारंभासाठी एकत्र जमले होते. त्याचवेळी ही गोळीबाराची घटना घडली आहे. वाचा : आई-वडिलांसमोरच 430 फूट उंच झुल्यावरून खाली पडला मुलगा, धक्कादायक VIDEO आला समोर एवोकैडो फळाच्या उत्पादसनासाठी प्रसिद्ध आहे मिचोआकन मेक्सिकोतील मिचोआकन राज्य हे जगभरात एवोकैडो नावाच्या फळासाठी प्रसिद्ध आहे. हे फळ खूपच महाग असतं. मिचोआकन आणि शेजारील गुआनाजुआतो हे मेक्सिकोतील सर्वाधिक हिंसक राज्य असल्याचं बोललं जातं. या राज्यांत ड्रग्ज तस्करी आणि बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या टोळ्यांमधील हिंसक संघर्षामुळे नेहमीच चर्चेत असतात. सरकारकडून ड्रग्ज विरोधी अभियान मेक्सिकोमध्ये 2006 पासून ड्रग्ज कार्टल संबंधित हिंसेच्या घटना होत आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या ड्रग्ज पेडलरच्या विरोधात सरकार सैन्यासोबत मिळून काम करत असून एक विशेष अभियान राबवलं जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, तेव्हापासून आतापर्यंत 3 लाख 40 हजारांहून हत्येच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे गँगवॉरच्या घटने दरम्यान झालेल्या गोळीबारामुळे झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला सेंट्रल मेक्सिकोतील एका घरावर शस्त्रधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 6 पुरुष तर 3 महिलांचा समावेश होता. मेक्सिकोमधील कायदा आणि सुव्यवस्था तसेच रोजगाराच्या संकाटामुळे तिथून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना दिसून येत आहे. मोठ्या संख्येत स्थानिक नागरिक हे शेजारील देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: America, Gun firing, Mexico

    पुढील बातम्या