अमेरिका, 10 सप्टेंबर: साऊथ इलिनियॉसमध्ये (South Illinois) गोळीबार (Firing) झाल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी दुपारी तीन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समजतंय. सध्या हे हल्लेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. बेलेव्हिल न्यूज डेमोक्रॅट्सकडे अद्याप मृत्यू झालेल्यांची नेमकी संख्या याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण स्थानिक माध्यमांनुसार जवळपास 6 लोक जखमी झालेत.
अनेक लोक जखमी
ईस्ट सेंट लुईस पोलीस प्रमुख केंडल पॅरी यांनी सांगितलं की, अनेक लोकांना गोळी लागली असून गोळीबाराची घटना ईस्ट साइड मीट मार्केटच्या बाहेर घडली. इलिनियॉस स्टेट पोलिसांनी असं म्हटलं आहे की, गुरुवारी रात्रीपर्यंत गोळीबार सुरू होता. हल्लेखोऱ्यांनी जवळच्या मेट्रो लिंकवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण कार अडकल्याने ते आपली गाडी सोडून पळून गेले. पोलीस परिसरातील संशयितांचा शोध घेत आहेत. ईस्ट सेंट लुईस हे अमेरिकेतील शहर आहे. जिथे खुनाचे प्रमाण खूप जास्त आहे.
नर्सचा ड्रेस घालून आली अन् पळवलं चिमुकलीला, ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
ईस्ट सेंट लुईस मिसौरीपासून 9.66 किमी अंतरावर आहे. . इलिनियॉस स्टेट पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की येथे येणं टाळावं आणि घरी राहावं. मेट्रोलिंक या भागातील गाड्यांच्या उशीराबाबत चेतावणी देत आहे. दोन प्रभावित स्थानकांच्या प्रवाशांना बस शटलद्वारे पाठवले जात आहे. सध्या या घटनेबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America