जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / महिला ऑनलाईन लघवी विकून कमवते बक्कळ पैसा, एक कप युरीनची किंमत तब्बल...

महिला ऑनलाईन लघवी विकून कमवते बक्कळ पैसा, एक कप युरीनची किंमत तब्बल...

महिला ऑनलाईन लघवी विकून कमवते बक्कळ पैसा, एक कप युरीनची किंमत तब्बल...

काही माणसं पैशांसाठी काहीही कामं करतात. अनेकजण पैसे कमविण्यासाठी सोप्या पद्धती शोधत असतात. त्याला ते स्मार्ट वर्क असंही संबोधतात. कमीतकमी मेहनतीत, धक्का न लागे असं काम करायचं आणि बक्कळ पैसे कमवायचे, असा विचार अनेकजण करत असतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 16 जानेवारी : लोक पैशांसाठी काय करतील याचा काहीच भरोसा नाही. अर्थात या जगात पैसे फार महत्त्वाचे आहेत. पैसे आहेत तर आयुष्य आहे. म्हणजे आयुष्यात मजा-मस्ती आहे. आपल्याकडे योग्य पैसे असले तर आपण आपल्या आयुष्यात सर्व सुखसोयींचा उपभोग घेऊ शकतो. जगभरात फिरु शकतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवू शकतो. पण पैसे मिळवण्यासाठी काय करावं हा शेवटी आपला निर्णय असतो. काही माणसं पैशांसाठी काहीही कामं करतात. अनेकजण पैसे कमविण्यासाठी सोप्या पद्धती शोधत असतात. त्याला ते स्मार्ट वर्क असंही संबोधतात. कमीतकमी मेहनतीत, धक्का न लागे असं काम करायचं आणि बक्कळ पैसे कमवायचे, असा विचार अनेकजण करत असतात. अर्थात तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. काही माणसं पैसे कमविण्यासाठी ऑनलाईन ट्रेडिंग करतात तर काहीजण सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून पोस्ट करतात. पण तुम्ही कधी कुणाला स्वत:ची लघवी विकून पैसे कमविताना बघितलं नसेल. कदाचित तुम्हाला हा एक विचित्रपणा वाटत असेल. पण हा विचित्रपणाकरुन एक मॉडेल पैसे कमावते. विशेष म्हणजे तिला त्यातून चांगले पैसेही मिळतात. याशिवाय ती तिच्या या कामामुळे जगभरात चर्चेत आली आहे. संबंधित मॉडेलचं कॅक्टस कुटी (Kactus Kutie) असं नाव आहे. कॅक्टस कुटी ही तिच्या शरीराचं वेस्ट वॉटर म्हणजेच युरीन (Woman sells urine online) विकते. तेच तिच्या उत्पन्नाचं एक चांगलं साधन असल्याची चर्चा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिची एक मेडिकल कप भरलेली युरीन म्हणजेच 3 औंस लघवी हजारो रुपयांना विकली जाते. तुम्हाला खरंतर हे किळसवाणं वाटेल पण तिची लघवी विकत घेणाऱ्यांची या जगात कमी देखील नाही. त्यामुळेच तर ती या क्षेत्रात यशस्वी ठरताना दिसत आहे. ( फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखणं आहे कठीण, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री ) तिच्या या कामाविषयी Daily Star वृत्तसंस्थेने माहिती जारी केली आहे. कॅक्टस कुटी (Kactus Kutie) ही Only Fans नावाच्या वेबसाईटवर मॉडेल आहे. तिथे तिने 2006 सालापासून अशाप्रकारचा व्यवसाय सुरु केला होता. विशेष म्हणजे कॅक्टस कुटी हिने आपल्या चाहत्यांना लघवी विकत देण्याचा व्यवसायच सुरु केला नाही तर त्यांच्यासाठी 10 मिनिटपर्यंत लघवी करण्याचादेखील व्हिडीओ शेअर केला होता. विशेष म्हणजे कॅक्टस कुटी ही प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. ती सांगते की, तिचे व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतात. तसेच त्या व्हिडीओजसाठी ती खूप प्रॅक्टिस करते, असंही तिने सांगितलंय. खरंतर कॅक्टसच्या चाहत्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सलग 10 मिनिटांपर्यंत कुणी कसं युरिनेट करु शकतं? तर कॅक्टस सांगते की, ती तसं महिन्यातून फक्त एक-दोन वेळाचं तसं करते. कारण त्याचा तिचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ( Credit Card वापरताना छोट्या चुका पडतील महागात, अशाप्रकारे करा Smart वापर ) कॅक्टस कुटीची लघवी थांबवून ठेवण्याच्या क्षमतेवर चाहते खूप प्रभावित झाले आहेत. ती इतका वेळ लघवी कशी साठवून ठेऊ शकते? असा प्रश्न त्यांना सतावतो. ती एक कप युरीन हे 5200 रुपयांना विकते. विशेष म्हणजे जो जास्त लघवी विकत घेतो अशा ग्राहकांना कॅक्टस डिस्काउंटदेखील देते. ग्राहक आपल्या लघीवाचा बर्फ बनवून सांभाळून ठेवतात, असा दावा या मॉडेलने केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात