जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Throwback: फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखणं आहे कठीण, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Throwback: फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखणं आहे कठीण, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Throwback: फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखणं आहे कठीण, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक चिमुकली दिसून येत आहे. अतिशय गोड असणारी ही चिमुकली आज प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जानेवारी-    मनोरंजन सृष्टीतील कलाकरांचे थ्रोबॅक फोटो   (Throwback Photo)  पाहणं किंवा त्यांच्या बालपणीचे फोटो (Childhood Photos)  पाहणं सर्वांनाच आवडत. आपला लाडका कलाकार पूर्वी कसा दिसत होता हे पाहायला चाहते फारच उत्सुक असतात. आज आम्ही एका अशाच अभिनेत्रीचा फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा तुम्हालाही ओळखते का कोण आहे ही अभिनेत्री? नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक चिमुकली दिसून येत आहे. अतिशय गोड असणारी ही चिमुकली आज प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचली होती. ही चिमुकली दुसरी कोणी नसून अभिनेत्री रिंकू राजगुरू   (Rinku Rajguru)   आहे. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक छोट्या रिंकूच कौतुक करत आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या बालपणीचा अतिशय गोंडस फोटो पाहून चाहते फारच आनंदी आहेत. रिंकू राजगुरूचा जन्म सोलापूरमधील अकलुज याठिकाणी झाला आहे. तिचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. परंतु तिला रिंकूच म्हटलं जातं. रिंकूने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं होतं. आपल्याच पहिल्याच चित्रपटाने तिला सुपरस्टार बनवलं होतं. मनोरंजन सृष्टीशी निगडित कोणतीही पार्श्वभूमी नसताना नागराज मंजुळे यांनी रिंकूची निवड केली. आणि तिने आपलं कौशल्य पणाला लावलं. या चित्रपटासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘सैराट’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा या चित्रपटाची धूम होती. या चित्रपटाचे हिंदी आणि तेलगूमध्येही रिमेक झाले आहेत.यांनतर रिंकूने अनेक चित्रपट आणि वेबसीरीज केल्या आहेत. फारच कमी वयात तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात

सध्या रिंकू आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. अभिनेत्रीने फारच कमी काळात स्वतःमध्ये मोठा बदल केला आहे. रिंकूचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क होतात. ती आधीपेक्षा जास्त स्लिम आणि फिट झाली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.सोबतच रिंकू आपल्या एक्सरसाइजचे फोटोसुद्धा शेअर करत असते चाहते तिच्या पोस्ट आणि व्हिडीओला मोठी पसंती देतात. रिंकू सध्या विविध प्रोजेक्टसमध्ये व्यग्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात