मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जो बायडन राष्ट्रपती झाल्यानंतर मुलाबद्दल धक्कादायक गोष्टी आल्या समोर; जाणून घ्या प्रकरण

जो बायडन राष्ट्रपती झाल्यानंतर मुलाबद्दल धक्कादायक गोष्टी आल्या समोर; जाणून घ्या प्रकरण

चीनच्या एका उद्योगपतीकडून हंटर यांना वर्षाला 10 मिलियन डॉलर मिळत असल्याचा उल्लेख एका मेलमध्ये करण्यात आला आहे.

चीनच्या एका उद्योगपतीकडून हंटर यांना वर्षाला 10 मिलियन डॉलर मिळत असल्याचा उल्लेख एका मेलमध्ये करण्यात आला आहे.

चीनच्या एका उद्योगपतीकडून हंटर यांना वर्षाला 10 मिलियन डॉलर मिळत असल्याचा उल्लेख एका मेलमध्ये करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन, 11 डिसेंबर : अमेरिकन राष्ट्रपती (US Election 2020) निवडणुकीत जो बायडन(Joe Biden) यांनी विजय मिळवला असून पुढील महिन्यात ते राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. परंतू त्याआधी त्यांच्या मुलावर नवीन संकट आले असून टॅक्स बुडवल्याच्या आरोप त्याच्यावर झाला असून, या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी देखील राष्ट्रपती निवडणुकीत हंटर बायडन यांनी (Hunter Biden ) चीन आणि युक्रेनमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप जो बायडन (Joe Biden) यांच्यावर केला होता. त्यामुळे आता त्याच्या संकटात वाढ होऊ शकते.

बीबीसीने या संदर्भात न्यूयॉर्क टाइम्सच्या(New York Times) हवाल्याने वृत्त दिलं असून यामध्ये त्यांनी एका संदिग्ध ई-मेलचा देखील उल्लेख केला आहे. या मेलमधे युक्रेनमधील ऊर्जा कंपनी बरिश्मा (Burisma) च्या एका अधिकाऱ्याने जो बायडन यांची भेट घालून दिल्याबद्दल हंटर याचे आभार मानले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी त्याला भली मोठी रक्कम मिळाल्याचा देखील दावा करण्यात येत आहे. डेलवर या राज्यामध्ये हंटरवर युक्रेनमध्ये पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, या युक्रेनमधील कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर हंटर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर हे आरोप केल्यानंतर त्यांनी आपलं ऑफिशियल शेड्युल तपासण्याची विनंती केली. आपल्या शेड्युलमध्ये कुठेही ही भेट झाली नसल्याचे देखील यावेळी बायडन यांनी स्पष्ट केले. युक्रेनच्या कंपनीच्या आणि जो बायडनमध्ये भेट झाली असल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये आले होते. परंतु बायडन यांना शेड्युलमध्ये याची नोंद करण्यात आलेली नाही. याच कंपनीबद्दल बोलायचे झाले तर युक्रेनमधील या कंपनीवर हंटर हा 2014 ते 2019 पर्यंत बोर्डावर होता. परंतु युक्रेन हा आधी सोव्हिएत रशियामध्ये होता त्यामुळे एकप्रकारे शत्रूराष्ट्र रशियाचा भाग मानला जातो. त्यामुळे या देशातील कंपनीवर हंटर असणं देशाच्या सुरक्षेला आव्हान दिल्यासारखं असल्याचं म्हटले जातं. हंटरने 2019 मध्ये या कंपनीच्या बोर्डावरून राजीनामा दिला. 2019 च्या मध्यात अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया होत होती. आपल्या वडिलांना यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे देखील त्यावेळी बोललं गेलं होतं.

हे वाचा - 130 वर्षांनी ट्रम्प सरकारचा वादग्रस्त निर्णय; विरोधाला न जुमानता मृत्युदंड

हंटर याचा चीनमध्ये मोठा व्यवसाय असून त्यासंदर्भात समोर आलेले हे आरोप फारसे धक्कादायक नाहीत. पॉलिटिफॅक्ट वेबसाईटच्या माहितीनुसार हंटर याने 2008 मध्ये चीनमध्ये आपला व्यवसाय सुरु केला होता. याआधी देखील त्याने चीनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्याच्या या आरोपांवर कंझव्हेटिव्ह लेखक पीटर स्वेजर यांनी एक पुस्तक देखील लिहिलं आहे. ‘Secret Empires: How the American Political Class Hides Corruption and Enriches Family and Friends’ नावाच्या या पुस्तकात हंटरविषयी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून त्याने कशा पद्धतीने चीनमध्ये आपला व्यवसाय विस्तारला होता याची माहिती देण्यात आली आहे. चीनमधील एका डिलसाठी स्वतः जो बायडन आपला मुलगा हंटर याच्यासोबत चीनमध्ये गेले होते. त्यावेळी बैठकीनंतर 10 दिवसांमध्ये चीनच्या बँक ऑफ चायनाकडून त्याला 1.5 बिलियन डॉलरची डील मिळाली होती असा आरोप ट्रम्प यांनी वारंवार केला होता.

या मेलमध्ये अनेक धक्कादायक गोष्टीसमोर येत असून चीनच्या एका उद्योगपतीकडून हंटर याला वर्षाला 10 मिलियन डॉलर मिळत असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. चीनच्या एका ऊर्जा कंपनीबरोबर हंटर याचा संबंध असल्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. हे पैसे त्याला केवळ भेट घडवून आणण्यासाठी दिले जात असल्याचंही मेलमध्ये लिहिलंय. परंतु या भेटी तो कुणाबरोबर घडवून आणत असे या संदर्भात कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

हे वाचा - बायकोसाठी कायपण! प्रसिद्ध कंपनीच्या CEO ने सोडला तब्बल 750 कोटी रुपयांचा बोनस

हंटर याच्यावर हे आरोप झाल्यानंतर जो बायडन यांनी याचा इन्कार केला असून आपल्या मुलाच्या व्यवसायाशी आपलं काही देणं-घेणं नसल्याचं बायडन यांनी म्हटल्यांचं फॉक्स न्यूजने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात जो बायडन उपराष्ट्रपती असताना हंटर बायडन याची सैन्यातून हकालपट्टी करण्यात आली होती. नशा केल्याचा आरोप त्यावेळी त्याच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच व्हाईट हाऊसमधील अतिशय गुप्त अशी माहिती असणारा लॅपटॉप एकदा त्याच्याकडून जप्त करण्यात आला होता. विशिष्ट कालावधीत हंटरने टॅक्स घोटाळा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवून सध्या त्याची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

First published:

Tags: Joe biden, President of america, World news