मराठी बातम्या /बातम्या /विदेश /130 वर्षांनी ट्रम्प प्रशासनाने घेतला वादग्रस्त निर्णय; विरोधाला न जुमानता दिला मृत्युदंड

130 वर्षांनी ट्रम्प प्रशासनाने घेतला वादग्रस्त निर्णय; विरोधाला न जुमानता दिला मृत्युदंड

अमेरिकेतील (U.S.) ट्रम्प प्रशासनानं (Trump Government )  lame-duck period मध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली. प्राणघातक इंजेक्शन देऊन मारलेला हा सर्वांत लहान वयाचा गुन्हेगार ठरला आहे.

अमेरिकेतील (U.S.) ट्रम्प प्रशासनानं (Trump Government ) lame-duck period मध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली. प्राणघातक इंजेक्शन देऊन मारलेला हा सर्वांत लहान वयाचा गुन्हेगार ठरला आहे.

अमेरिकेतील (U.S.) ट्रम्प प्रशासनानं (Trump Government ) lame-duck period मध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली. प्राणघातक इंजेक्शन देऊन मारलेला हा सर्वांत लहान वयाचा गुन्हेगार ठरला आहे.

न्यूयॉर्क, 11 डिसेंबर:  अमेरिकेतील (U.S.) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव झाला आहे. आता ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अमेरिकेत एक अध्यक्ष पायउतार झाल्यानंतर दुसरा अध्यक्ष अधिकापदावर येईपर्यंतच्या कालावधीला लेम डक पिरियड (lame-duck period) असं म्हटलं जातं. या कालावधीत गेल्या 130 वर्षांत कुणीही न घेतलेला निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला.

ट्रम्प प्रशासनानं मोठ्या विरोधाची पर्वा न करता ब्रँडन बर्नार्ड या 40 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची (Federal Execution) अंमलबजावणी केली आहे.  टेक्सास प्रांतातील एका जोडप्याचा 22 वर्षांपूर्वी खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं ब्रँडनला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. गुन्हा केला त्या वेळी ब्रँडन 18 वर्षांचा होता. त्यामुळे त्याची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करावी, अशी मागणी होत होती. अध्यक्षपद सोडण्याची औपचारिकता पूर्ण करण्यास एक महिन्यांचा कालावधी उरलेला असतानाच ट्रम्प यांनी हा वादग्रस्त निर्णय घेतला आहे.

मृत्युदंडाला होता मोठा विरोध

ब्रँडनच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करावं या मागणीसाठी अमेरिकेत मोठी मोहीम राबवण्यात आली होती. सोशल मीडियावरही अनेकांनी त्याची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.

(हे वाचा-लेकीला सोडायला गेले अन् घरावर पडला दरोडा, तब्बल दीड कोटींचं सोनं लुटलं)

डोनाल्ड ट्रम्प प्रशासानानं मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी अशी मागणी अभिनेत्री किम कार्दशियनसह अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी केली होती. ब्रँडनची शिक्षा दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी अमेरिकन सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळताच ट्रम्प प्रशासनानं शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

'न्याय मिळाल्याची भावना'

ब्रँडननं मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या मनोगतामध्ये त्याचे कुटंबीय तसंच त्यानं ज्या जोडप्याची हत्या केली त्या बॅगली कुटुंबीयाची माफी मागितली आहे. ब्रँडनच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्याबद्दल बॅगली कुटुंबानं ट्रम्प प्रशासनाचे आभार मानलेत. ‘गेल्या दोन दशकांपासून आम्ही ज्या न्यायाची प्रतीक्षा करत होतो तो न्याय आम्हाला मिळाला’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Donald Trump