बर्लिन, 11 डिसेंबर : तुमच्या गर्लफ्रेंडसाठी (girlfriend), बायकोसाठी (wife) तुम्ही काय काय कराल? तिच्यासाठी मी सर्वकाही करेन तिनं फक्त बोलावं असंच तुम्ही म्हणाल. पण तिच्यासाठी तुम्ही तुमची भरमसाठ पगाराची नोकरी किंवा बोनस सोडाल का? नाही ना. मात्र असं केलं आहे ते जर्मनीतील एका प्रसिद्ध कंपनीच्या सीईओनं. बायकोसाठी त्यांनी आपली मोठ्या पगाराची नोकरी, कोट्यवधींचा बोनस सोडून घर आणि मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.
जर्मनीतील (Germany) सर्वात प्रसिद्ध ऑनलाइन फॅशन रिटेलर कंपनी जलांडो एसई (online fashion retailer Zalando SE) चे को-सीईओ रुबिन रिटर (Rubin Ritter) यांनी आपल्या पत्नीच्या करिअरसाठी 112 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 750 कोटी रुपयांचा बोनस सोडण्याचा निर्णय घेतला.
रुबिन यांची पत्नी न्यायाधीश आहे आणि मुलांसाठी त्यांना आपल्या करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागला होता. रुबिन रिटर यांनी सांगितलं, पुढील वर्षी ते रिटायरमेंट घेणार आहेत जेणेकरून त्यांना आपल्या पत्नीचं करिअर पुढे नेण्यास मदत मिळेल. घर आणि मुलांची जबाबदारी आता ते घेणार आहेत. 6 डिसेंबर 2020 रोजी रिटर यांनी सांगितलं की, आम्ही हा निर्णय एकत्रितरित्या घेतला आहे. आगामी वर्षात पत्नीच्या करिअरला वेग देणं ही माझी प्राथमिकता असेल. रिटर यांनी असं केलं तर त्यांना 10 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 750 कोटी रुपयांचा बोनस सोडावा लागेल.
हे वाचा - बायकोच्या हाती लागली एक चावी आणि एका क्षणात उलगडले नवऱ्याचे सर्व सिक्रेट्स
रुबिन यांच्या या निर्णयाला जलांडो एसईचा पब्लिसिटी स्टंट मानला जातो आहे. लैंगिक भेदभावाच्या मुद्द्यावरून ही कंपनी ग्राहकांच्या निशाण्यावर आहे. जलांडो एसईचे सर्वाधिक ग्राहक महिला आहेत मात्र पाच सदस्यीय बोर्डमध्ये सर्व पुरुष आहेत. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये महिला प्रतिनिधी नसल्यानं त्यांना टिकेचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी ऑल ब्राइट फाऊंडेशननं कंपनीला धारेवर धरलं होतं. यानंतर कंपनीनं टॉप एक्झ्युक्युटिव्ह लेव्हलवर महिलांना प्राधान्य देण्याचं आणि 2023 पर्यंत मॅनेजमेंट बोर्डमधील महिला प्रतिनिधींचं प्रमाण 40 टक्के केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं.
हे वाचा - अजब प्रथा! हसत हसत या महिला का खातात चाबकाचे फटके?
त्यामुळे रुबिन यांचा हा निर्णय म्हणजे एकप्रकारचा ड्रामा असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. रुबिन आपल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी हे सर्व करत असल्याचं लोक म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship, Wife and husband, World news