नवी दिल्ली, 2 जुलै : एका तरुणाने स्वत:च्या प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही इंजेक्ट केलं की, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हे इंजेक्शन लावल्यानंतर त्याच्या शरीरात अनेक साइड इफेक्ट झाले. त्याने याचे काही फोटोही शेअर केले होते. इंजेक्शन लावल्यामुळे त्याची प्रकृती इतकी बिघडली की, त्याचा मृत्यू झाला.
28 वर्षीय तरुणाचं नाव जॅक चॅपमॅन आहे. जॅक ऑस्ट्रेलियाचा राहणारा होता. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचं कारण सिलिकॉन इंजेक्शन सिंड्रोम असल्याचं सांगितलं आहे. त्याला फुप्फुसातही त्रास जाणवत होता.
प्रायव्हेट पार्टमध्ये सिलिकॉन इंजेक्शन लावल्यानंतर जॅकच्या शरीरावर सूज आली होती. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. इंजेक्शनच्या साइड इफेक्टमुळे त्याची ही अवस्था झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मेट्रो युकेच्या रिपोर्टनुसार, जॅक समलैंगिक समुदायामधील Master-Slave Relationship मध्ये सामील होते. जॅकच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी प्रसिद्ध समलैंगिक ब्लॉगर डायलन याला दोषी ठरवलं आहे. शरीरात बदल घडवण्यासाठी सिलिकॉन इंजेक्शन लावण्यासाठी जॅकला प्रेरित करण्यात आल्याचा आईचा आरोप आहे. ही घटना 2019 ची असली तरी काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने याबाबत वक्तव्य केल्यानंतर प्रकरण चर्चेत आलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.